Child Care Tips : तुमच्याही मुलांना सतत पोटदुखी होते का ? 'हे' करुन पहा मिनिटांत होईल दूर !

आपल्या सवयींमुळे आपण बऱ्याचदा अनेक आजारांचे शिकार बनतो. खासकरून लहान मुलाना याचा जास्त शिका असतो.
Child Care Tips
Child Care TipsSaam Tv
Published On

Health Tips: सुदृढ आयुष्य जगायचं असेल तर स्वस्थ जीवनशैलीला अनुसरल पाहिजे. आपल्या सवयींमुळे आपण बऱ्याचदा अनेक आजारांचे शिकार बनतो. खासकरून लहान मुलाना याचा जास्त शिका असतो.

पोटामधील जंत ही एक अशी समस्या आहे. ज्यामुळे प्रत्येक लहान मुलगा पोटदुखीला त्रासलेला आहे. तुम्ही बऱ्याचदा हे नोटीस केलं असेल की तुमच्या मुलाला भूक लागत नाही आहे , त्याचं पोट खराब आहे आणि त्याचबरोबर त्याला पोटदुखी ही समस्या देखील सुरू झालेली आहे.

Child Care Tips
Child Care Tips : मुलांना त्यांच्या वयानुसार या गोष्टी शिकवा, मुलांच्या स्वभावात फरक दिसेल

पण बरेच पालक (Parents) या समस्येला छोटी समस्या समजून नजरअंदाज करतात. पण या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे हे अत्यंत चुकीचं आहे. पोटामधील जंत निघून जाण्यासाठी आम्ही आज तुम्हाला काही घरगुती ट्रिक (Home Remedies) सांगणार आहोत.

या घरगुती उपायांमुळे तुमच्या मुलाच्या पोटातील जंत बाहेर पडतील आणि त्याला पोटदुखीचा (Stomach) त्रास होणार नाही.

1. पोटपासून सुरू होणाऱ्या समस्यांवर उपाय म्हणून कच्ची पपई ही फायदेशीर असते. पपईच्या नियमित सेवनाने पोटातील सगळे जंत नष्ट होऊन जातात. तुमच्या मुलाच्या पोटात देखील जंत झाले असतील तर एक चमचा पपईचा रस घेऊन गरम पाण्यामध्ये मिसळून त्यामधे मधाचे एक दोन थेंब टाका. त्याचबरोबर पपईच्या बियांना पिसून एक ग्लास गरम पाणी (Water) किंवा दुधामधून देखील तुम्ही तुमच्या मुलांना देऊ शकता.

2. पोटाच्या विकारांवर नारळाचं तेल अतिशय फायदेशीर असते. त्याचबरोबर नारळाच्या सेवनाने शरीरामधील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकले जातात. सोबतच नारळ आपल्या पोटाधील जंत मारून टाकतात. जर तुमचं मूलं अशा प्रकारचा समस्यांपासून ग्रस्त आहे तर त्याला रोज नारळाचे पाणी पियायाला द्यावे. याशिवाय एक चमचा किसलेला नारळ किंवा नारळाचं तेल पिल्यास पोटाचे विकार नष्ट होऊन जातात.

Stomach pain
Stomach paincanva

3. अननस हे फळ सर्वांनाच आवडते. लहान मुलांना अननस जास्त प्रमाणात आवडते. त्याचबरोबर पोट दुखी किंवा पोटांधील किडे नष्ट होण्यासाठी अननस उपयुक्त ठरते. दररोज सकाळी उठल्याबरोबर लहान मुलांना अननसचा ज्युस प्यायल्याने लवकरात लवकर रिझल्ट दिसू लागतील.

4. डाळिंबाच्या सेवनाने पोट दुखी थांबते. त्याचबरोबर पोटामधील किडे नाहीसे होण्यास डाळिंब उपयुक्त ठरते. तुम्ही डाळिंबाची साल पाण्यामध्ये उकळवून रात्रभर भिजत ठेवा आणि हे पाणी दुसऱ्या दिवशी आणुषापोटी तुमच्या मुलाला प्यायला द्या.

5. तुमच्या मुलाच्या पोटात जंत झाले असतील किंवा पोट दुखत असेल तर तुळशीची पाने यावर रामबाण उपाय ठरू शकतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com