Chanakya Niti: बायकांनो! नवऱ्यापासून 'या' ४ गोष्टी लपवणं आहे शहाणपणाचं काम; नाहीतर सुखी संसारात येईल दु:ख

Chanakya Niti for Women: तुमच्या पतीसोबत तुम्ही काही गोष्टी शेअर केल्याने तुमचे नाते बिघडू शकते? आचार्य चाणक्य त्यांच्या नीतीमध्ये महिलांना चार गोष्टींपासून सावध करण्यात आले आहे. या चार गोष्टी नवऱ्याला माहिती झाल्या तर आनंदी जीवनात दु:ख येतात.
Chanakya Niti for Women:
Chanakya Niti reveals 4 things women should never share with their husbands for a peaceful and happy marriage.saam tv
Published On
Summary
  • चाणक्य नीतीमध्ये वैवाहिक नात्यांवरील मार्गदर्शन करण्यात आले आहे.

  • महिलांनी चार गोष्टी नवऱ्यापासून लपवाव्यात

  • संयम, शहाणपणा आणि विचारपूर्वक वागणं हे सुखी संसाराचा मंत्र आहे.

आचार्य चाणक्य हे भारतीय इतिहासातील एक महान विचारवंत होते. त्यांचे उपदेश आजही जीवनाचे मार्गदर्शन करतात. त्यांच्या ज्ञानाचा वापर करून, त्यांनी जीवनातील तत्वे स्थापित केली. या नीतीनुसार प्रत्येक व्यक्तीला आनंद, यश आणि स्थिरता मिळते. आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या नीतीमध्ये काही गोष्टी आहेत, ज्या प्रत्येक विवाहित महिलेने पाळल्या पाहिजेत.

नाहीतर वैवाहिक जीवनात प्रेम आणि आदर टिकून राहणार नाही. चाणक्य नीतिनुसार जर महिलांनी त्यांच्या पतींसोबत काही गोष्टी शेअर केल्या तर त्यांचे नाते हळूहळू तुटू लागते. चला जाणून घेऊया त्या गोष्टी कोणत्या आहेत.

माहेरकडील चर्चा जास्त करू नका

आचार्य चाणक्य यांच्या मते, पत्नीने तिच्या पालकांच्या घराबद्दलची प्रत्येक गोष्ट तिच्या पतीला सांगू नये. नेहमी माहेरच्या गोष्टी सांगतिल्यानं पत्नी नेहमीच तिच्या पालकांच्या घराची बाजू घेते किंवा तुलना करत असते, असं तिच्या नवऱ्याला वाटू लागते. यामुळे घरातील वातावरण बिघडू शकते आणि अनावश्यक तणाव निर्माण होऊ शकते. संतुलन राखणे, फक्त आवश्यक गोष्टींवर चर्चा करणे शहाणपणाचे आहे.

Chanakya Niti for Women:
Shukraditya Rajyog 2025: शुक्रादित्य राजयोग ३ राशींना करणार मालामाल; व्यापार आणि नोकरीच्या ठिकाणी मिळणार मदत

पैशांची बचत

आचार्य चाणक्य यांच्यानुसार,पत्नीने नेहमी वैयक्तिक बचतीचे चर्चा करू नये. या गोष्टींमुळे कधीकधी गैरसमज निर्माण होऊ शकतात. आर्थिक बाबींमध्ये पारदर्शकता महत्त्वाची आहे, पण वैयक्तिक आर्थिक स्वातंत्र्यही तितकेच महत्त्वाचे आहे. हुशारीने खर्च करणे आणि योग्य हेतूने बचत करणे तुमचे नाते मजबूत करत असते.

Chanakya Niti for Women:
Mangal Gochar 2025: 27 ऑक्टोबरपासून 'या' राशींचा सुरु होणार गोल्डन टाईम; मंगळ ग्रह करणार स्वतःच्याच राशीत प्रवेश

मनाला लागणारे शब्द

प्रत्येक नाते परस्पर आदरावर बांधले जात असते. चाणक्य नीती म्हणते की रागाच्या भरात आपण काही बोलून जात असतो. त्यामुळे आपल्या जोडीदाराचे मन दुखवले जाऊ शकते. बोलले शब्द परत घेता येत नाही. कधीकधी, स्त्रिया वादाच्या वेळी किंवा रागाच्या वेळी असे काही बोलतात ज्यामुळे त्यांचे पतीचे दुखावत असते. रागाच्या वेळी गप्प राहणे आणि मन शांत असताना बोलणे चांगले असते. शांतता ही नातेसंबंधांमध्ये सर्वात मोठी ताकद आहे.

खोटेपणा

चाणक्य नीती स्पष्टपणे सांगते की, "खोटेपणा ही नात्यातील सर्वात मोठी कमजोरी आहे." पती-पत्नीमधील नाते विश्वासावर आधारित असते. एकदा का विश्वास तुटला की तो पुन्हा निर्माण करणे अत्यंत कठीण असते. म्हणून, परिस्थिती कितीही कठीण असली तरी कधीही खोटे बोलू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com