Chanakya Niti
Chanakya Niti Saam Tv

Chanakya Niti : चाणक्यांनी श्लोकाद्वारे सांगितले, जगात या 4 गोष्टींपेक्षा मोठे काहीही नाही

Chanakya Niti For Life : आचार्य चाणक्य यांची धोरणे आणि विचार आजच्या काळातही समर्पक आहेत.
Published on

Chanakya Niti Quotes : आचार्य चाणक्य यांची धोरणे आणि विचार आजच्या काळातही समर्पक आहेत. चाणक्यांनी पैसा, व्यवसाय, प्रगती आणि आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर उपायही सांगितले आहेत. माणसाला आयुष्यात यश मिळवायचे असेल तर त्याला हे विचार आयुष्यात आणावे लागतात.

आज आपण आचार्य चाणक्य यांच्या यापैकी एका विचाराचे विश्लेषण करणार आहोत. आजचा विचार चाणक्याच्या धोरणांनुसार सर्वात महत्वाच्या गोष्टींचा आहे. चाणक्याने एका श्लोकाद्वारे त्या चार गोष्टींचा उल्लेख केला आहे ज्यांचे स्थान सर्वात वरती आहेत. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या चार गोष्टी.

Chanakya Niti
Chanakya Niti For Money : आयुष्यात श्रीमंत व्हायचंय? चाणक्यांनी सांगितलेले 4 सल्ले एकदा वाचाच

नात्रोदक समं दानं न तिथि द्वादशी समा।

न गायत्र्या: परो मन्त्रो न मातुदैवतं परम्।।

या श्लोकाद्वारे आचार्य चाणक्य यांनी अन्न हे मानवासाठी सर्वात मोठे दान असल्याचे स्पष्ट केले आहे. चाणक्य म्हणातात की, भुकेल्याला अन्न देणे आणि तहानलेल्याला पाणी (Water) देणे यापेक्षा अधिक पुण्य दुसरे काहीही ​​नाही.

Chanakya Niti
Chanakya Niti For Office Behaviour : ऑफिसमध्ये या चुका अजिबात करू नका, तुमचं वर्तमान आणि भविष्य बिघडेल, जाणून घ्या

याशिवाय चाणक्याने हिंदू पंचांगातील 12वी तिथी म्हणजेच द्वादशीचा दिवस अत्यंत पवित्र मानला आहे. या दिवशी भगवान विष्णूची उपासना आणि उपवास केल्यास फलदायी ठरते.

त्याचबरोबर आचार्य चाणक्य यांनी गायत्री मंत्राला सर्वात मोठा मंत्र म्हटले आहे. या मंत्राचा जप केल्याने मनुष्याला शक्ती (Power), युक्ती आणि धन प्राप्त होते.

Chanakya Niti
Chankya Niti For Students : चाणक्यांचे हे 3 सल्ले ठरतील विद्यार्थ्यांच्या यशासाठी उपयुक्त, वाचा सविस्तर

या श्लोकाच्या शेवटी चाणक्यांनी मातेचे वर्णन मानवासाठी विश्वातील सर्वात श्रेष्ठ मानले आहे. चाणक्य म्हणतात की आईपेक्षा (Mother) मोठा देव किंवा गुरु नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com