वाईट बातमी! 'ही' सरकारी बँक संकटात; शेकडो शाखा बंद करणार, जाणून घ्या कारण

जर तुमचे खाते सार्वजनिक क्षेत्रातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) मध्ये असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
Central Bank Of India
Central Bank Of India Saam Tv
Published On

जर तुमचे खाते सार्वजनिक क्षेत्रातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) मध्ये असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. वास्तविक, आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी बँकेने (bank) मोठ्या प्रमाणात शाखा बंद करण्याचा विचार केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बँक आपल्या देशभरातील १३ टक्के शाखा बंद करण्याचा विचार करत आहे.

हे देखील पाहा-

बँक मार्च २०२३ पर्यंत देशभरातील ६०० शाखा बंद करण्याचा किंवा तोट्यात चाललेल्या शाखांचे विलीनीकरण (Merger) करण्याचा विचार करत आहे. सेंट्रल बँक (Bank)ऑफ इंडियाच्या (central bank of india) देशभरात ४५९४ शाखा आहेत. विशेष म्हणजे, २०१७ मध्ये, सेंट्रल बँक ऑफ इंडियासह अनेक बँकांना RBI च्या त्वरित सुधारात्मक कारवाई (PCA) यादीत टाकण्यात आले होते. वाईट आर्थिक स्थितीतून जात असलेल्या बँकांना या यादीत टाकण्यात आले आहे.

Central Bank Of India
भाजपच्या नेत्याला दिल्लीतून अटक, पंजाब पोलिसांची कारवाई

या यादीत येणाऱ्या बँकांना अनेक बंधने घालून त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याची संधी देण्यात आली होती. २०१८ मध्ये देखील १२ बँकांना RBI च्या PCA फ्रेमवर्कमध्ये ठेवण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यामध्ये ११ सरकारी आणि १ खाजगी बँक होती. ज्यांना अतिरिक्त खेळते भांडवल प्रदान करण्यात आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, सेंट्रल बँक ऑफ इंडिया वगळता इतर सर्व बँका पीसीए यादीतून बाहेर आल्या आहेत. परंतु, आर्थिक स्थितीत कोणतीही सुधारणा न झाल्याने सेंट्रल बँक या यादीत राहिली. अशा परिस्थितीत बँकेची आर्थिक स्थिती सुधारण्याच्या उद्देशाने १३ टक्के शाखा बंद करण्याचा विचार केला जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com