CBSE Board Exam 2025: सीबीएसई बोर्डाची परीक्षा १५ फेब्रुवारीपासून, कधी आणि कसे मिळतील परीक्षेचं हॉल तिकीट

CBSE Board Exam 2025: सीबीएसई १० आणि १२ वी बोर्डाच्या परीक्षा पुढील महिन्यात होणार आहेत. या परीक्षेचं अॅडमिट कार्ड लवकरच दिलं जाणार आहे. तसेच परीक्षेसंदर्भात सीबीएसई बोर्डाकडून नियमावली जाहीर करण्यात आलीय.
CBSE Board Exam 2025 Hall Ticket
CBSE Board Exam 2025 Economics
Published On

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून १५ फेब्रुवारीपासून १०वी- १२ वी बोर्डाची परीक्षा घेतली जाणार आहे. बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना सीबीएसईकडून लवकरच प्रवेशपत्र दिले जाणार आहे. हॉल तिकीट अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर प्रसिद्ध केले जाणार आहे. परीक्षेला बसणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित शाळांमधून हॉल तिकीट मिळतील. तर खासगी संस्थेतून शिक्षण घेणाऱ्या परीक्षार्थ्यांना सीबीएसईच्या वेबसाइटवर जाऊन प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील.

जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत वेळापत्रकानुसार, CBSE १०वीची परीक्षा १५ फेब्रुवारी ते १८ मार्च आणि १२ वीची परीक्षा १५ फेब्रुवारी ते ४ एप्रिल दरम्यान घेतली जाणार आहे. वृत्तानुसार, फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अॅडमिट कार्ड दिले जाणार आहेत. दरम्यान बोर्डाने अजून कोणतीच अधिकृत तारीख जाहीर केली नाहीये. दरम्यान CBSE बोर्डाशी संलग्न असलेल्या शाळांचे मुख्याध्यापक त्यांची ओळखीने विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील. सीबीएसई सर्व शाळांना मेलद्वारे प्रवेशपत्र जारी करण्याबद्दल माहिती देण्यात येईल.

CBSE Board Exam 2025 Admit Card How to Download: असे डाउनलोड करा प्रवेशपत्र

CBSE च्या अधिकृत वेबसाईट cbse.gov.in वर जा.

होमपेजवर दिलेल्या १० वी आणि १२वी बोर्ड परीक्षा २०२५ हॉल तिकीटच्या लिंकवर क्लिक करा.

आता खासगी विद्यार्थी नोंदणी क्रमांक इत्यादी आवश्यक माहिती भरा आणि सबमिट करा.

ॲडमिट कार्ड स्क्रीनवर दिसेल. ते चेक करा आणि डाउनलोड करा.

कोणत्याही विद्यार्थ्याला प्रवेशपत्राशिवाय परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही, हे नियमित व खासगी विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे. हॉलतिकीटासोबत शाळेचे ओळखपत्र आणि आधार कार्डही परीक्षा केंद्रावर न्यावे लागेल.

CBSE ने इयत्ता 10वी आणि 12वीच्या सर्व विषयांसाठी मॉडेल पेपर जारी केले आहेत, जे विद्यार्थी बोर्डाच्या वेबसाइटवरून डाउनलोड करू शकतात. दरम्यान यावेळी ही परीक्षा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली घेतली जाणार आहे. सीबीएसईने परीक्षेसाठी तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com