Laptop Repairing Tips : लॅपटॉप दुरुस्त करायला देताय ? तर 'या' गोष्टींची काळजी घ्या

लोकांना लॅपटॉप वर काम करत असताना बऱ्याच समस्या येत असतात अशा वेळेस आपण स्वतःहून लॅपटॉप दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत असतो.
Laptop Repairing Tips
Laptop Repairing TipsSaam Tv

Laptop Repairing Tips : हल्ली लॅपटॉपचा वापर जास्ती वाढलेला आहे. कोरोना काळापासून लोक वर्क फ्रॉम होम अधिक प्रमाणात करत आहेत. जवळजवळ ८ ते १० तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ आपण त्यावर काम करत असतो.

लोकांना लॅपटॉप वर काम करत असताना बऱ्याच समस्या येत असतात अशा वेळेस आपण स्वतःहून लॅपटॉप दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यानंतरही आपल्याला काही प्रगती दिसली नाही तर आपण दूरस्ती करायला बाहेर दुकानात देतो. अशा वेळेस तुमच्या डेटाची विशेष काळजी घेणे आवश्क आहे.

Laptop Repairing Tips
Laptop Buying Guide : लॅपटॉप घेताना 'या' 5 गोष्टी नक्की पाहा, राहाल फायद्यात...!

आजकाल हॅकिंगच्या वेगवेगळ्या पद्धती समोर येत आहेत, ज्यामुळे वैयक्तिक डेटा धोक्यात राहतो. लॅपटॉप असो, फोन असो किंवा संगणक असो,आपला वैयक्तिक डेटा प्रत्येक उपकरणावर असतो. म्हणूनच केव्हाही तुम्ही बाहेर लॅपटॉप रिपेअरिंगसाठी देत ​​असाल तर त्याआधी काही गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे.

Laptop Repairing Tips
Laptop Repairing TipsCanva

कधीच तुमचा लॉगिन पासवर्ड कोणालाही सांगू नका. अनेक वेळा तुम्हाला टेक्निकलद्वारे लॉगिन आणि पासवर्ड विचारले जाते. अशा वेळेस त्यांना पासवर्ड कशासाठी पाहिजे हे विचारणे गरजेचे आहे. तरीही पासवर्ड देणे खूप महत्त्वाचे असल्यास, सर्वप्रथम तुमचे मायक्रोसॉफ्ट खाते लॉगआउट करा आणि लॉकर खाते लॉगिन तयार करा.

  • लॅपटॉपमधील सेन्सिटिव्ह सॉफ्टवेअर Uninstall करा ज्यामध्ये सेटिंग,युझर डेटा आणि हिस्टरी आहे.

  • तसेच फेसबुक,WhatsApp, इन्स्टाग्राम आणि बँक खाते यांसारखे सोशल मीडिया लॉगआउट करा. सर्व ब्राउझिंग हिस्टरी क्लिअर करा .

  • तुम्ही क्लाउड स्टोरेजमध्ये वन ड्राइव्ह आणि Google वापरू शकता. Google ड्राइव्ह फाईल आणि खाजगी डेटा सुरक्षित ठेवते.

  • तुम्ही या प्लॅटफॉर्मसाठी प्रीमियम option देखील वापरू शकता, जे तुम्हाला अतिरिक्त जागा देईल.

  • शेवटी, तुमच्या सर्व खाजगी डेटाला पासवर्ड लावून सेफ करू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com