Betel Nut Benefits : पिवळ्या दातांमुळे हसताना लाज वाटते? आयुर्वेदातील हा रामबाण उपाय करुन पाहाच

Brush With Betel Nut Powder : सुपारी खाल्याने दात स्वच्छ करण्यासोबतच श्वासाच्या दुर्गंधीसारख्या समस्या दूर होतात.
Betel Nut Benefits
Betel Nut Benefits Saam Tv
Published On

Brushing With Betel Nut :

तुम्ही कधी सुपारी खाल्ली असेल तर तुम्हाला सुपारीची चव माहित असेलच. मात्र, सुपारी खाण्याची आवड असणारे अनेक जण आहेत. वास्तविक, सुपारी ही उष्ण असते आणि त्यात बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात.

सुपारी खाल्याने दात स्वच्छ करण्यासोबतच श्वासाच्या दुर्गंधीसारख्या समस्या दूर होतात. याशिवाय सुपारीने दात घासण्याचे अनेक फायदे (Benefits) आहेत. चला, याच्या सहाय्याने दात कसे स्वच्छ करायचे ते जाणून घेऊया.

सुपारी कशी घासायची?

सुपारीने दात स्वच्छ (Clean) करण्यासाठी सुपारीला आगीत भाजून घ्या. नंतर सुपारीला खलबत्त्यात बारीक करून घ्या/ कुस्करून पावडर बनवा. यानंतर या पावडरने दररोज ब्रश करा.

दात मोत्यासारखे चमकतील

सुपारीची पावडर घासण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते ऑक्सिडेशन प्रक्रियेत खूप वेगवान काम करते. जेव्हा तुम्ही दात (Teeth) घासता तेव्हा तुमचे दात चमकतात आणि त्यांच्यावर साचलेला पिवळा थर कमी होऊ लागतो. यामुळे दात मोत्यासारखे चमकतात.

Betel Nut Benefits
Baby Having Loose Motion While Teething : बाळांना दात येण्याच्या काळात का होतात जुलाब? जाणून घ्या यामागचे योग्य कारण

श्वासाची दुर्गंधी नाही

काही लोकांच्या तोंडाला दुर्गंधी येते. ही खरं तर पायोरियाची समस्या आहे. जेव्हा तुम्ही सुपारीने दात घासता तेव्हा ते श्वासाची दुर्गंधी कमी करण्यास उपयुक्त ठरते. त्यामुळे सुपारीच्या पावडरने ब्रश केल्याने तुमचे तोंड पूर्णपणे स्वच्छ होते आणि तुमचा श्वास ताजेतवाने होतो. त्यामुळे श्वासाची दुर्गंधी येत नाही.

Betel Nut Benefits
Baby Teething : तुमच्या बाळाचे दुधाचे दात येतायत? कशी घ्याल काळजी

हिरड्यांमधून रक्त येण्याच्या समस्येत फायदेशीर

हिरड्यांमधून रक्त येण्याच्या समस्येवर सुपारी घासणे फायदेशीर आहे. वास्तविक, काही लोकांच्या हिरड्यांमधून रक्तस्राव होतो आणि ही समस्या वाढू लागते. सुपारीतील अँटिऑक्सिडंट्स बरे करणाऱ्यांप्रमाणे काम करतात आणि हिरड्यांमधून रक्तस्त्राव होण्याची समस्या कमी करण्यास मदत करतात. अशा प्रकारे ही टूथपावडर दातांसाठी फायदेशीर ठरते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com