Physical Relationship : वाढत्या वयानुसार आपले आपल्या जोडीदारावरचे (Partner) प्रेम देखील वाढत जाते. परंतु, वाढत्या वयानुसार आपले लैंगिक संबंध देखील कमी होत जातात ज्यामुळे आपल्या नात्यावर (Relation) परिणाम होतो. तज्ज्ञ सांगतात की, तणाव, आरोग्याच्या समस्या व बदलेली जीवनशैली यामुळे आपली सेक्स करण्याची इच्छा कमी होऊ लागते. मात्र काही वेळा यासाठी वय वाढणे हे देखील महत्त्वाचे कारण आहे.
काहींना आपले लैंगिक जीवन पूर्वीसारखे समाधानकारक व आनंददायी वाटत नाही. तर याचे कारण सेक्स ड्राइव्ह कमी होत जाणे परंतु, आपली सेक्स ड्राइव्ह पूर्वी सारखी करण्यासाठी करुन ती मजेशीर करु शकता. (Latest Marathi News)
पती-पत्नीचे व्यस्त वेळापत्रक आणि थकवा हे त्यांच्या लैंगिक जीवनात व्यत्यय येण्याचे सर्वात मोठे कारण आहे. इच्छेनुसार सेक्स ड्राइव्ह वाढवता किंवा कमी करता येत नाही. त्यासाठी प्रेम, शरीर संबंध आणि थोडा वेळ हवा असतो. या 6 टिप्स फॉलो केल्यास तुमची कमी होत चाललेली सेक्स ड्राइव्ह वाढवण्यासाठी प्रयत्न होईल. (Boost your Physical drive)
1. दररोज एकमेकांसोबत वेळ घालवा
तुमच्या लाइफ पार्टनरसोबत दररोज किमान 20 मिनिटे क्वालिटी टाइम घालवा. जे जोडपे दररोज एकत्र वेळ घालवतात त्याचे नाते अधिक घट्ट बनते तसेच जवळीक साधता येते. त्यामुळे सेक्स ड्राइव्हही वाढते.
2. पौष्टिक आहार घ्या
उत्तम लैंगिक जीवनासाठी, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पौष्टिक आहार घेणे. पुरुषांच्या सेक्स इच्छेवर टेस्टोस्टेरॉनचा प्रभाव असतो आणि महिलांच्या सेक्स इच्छेवर इस्ट्रोजेनचा प्रभाव असतो. प्रक्रिया केलेले अन्न, जंक फूड आणि तळलेले अन्न लैंगिक उत्तेजना कमी करतात. दारू आणि सिगारेटच्या सेवनाने लैंगिक उत्तेजनाही कमी होते. डार्क चॉकलेट, अंडी, चिकन, हिरव्या भाज्या, सोयाबीन, ब्रोकोली, फळे, दूध-दही, हिरव्या भाज्या, लसूण, ड्राय फ्रूट्स, आले, दालचिनी, देशी तूप यांचा आहारात समावेश करा. त्यामुळे कामेच्छा कमी करणाऱ्या समस्यांना प्रतिबंध होतो.
3. फोरप्ले आणि आफ्टरप्ले महत्वाचे
सेक्स करताना फोरप्ले आणि आफ्टरप्लेवर लक्ष केंद्रित केल्याने कामवासना वाढते. जोडपे एकमेकांना बराच वेळ स्पर्श करतात आणि आनंददायक संभोगासाठी त्यांच्या विविध भागांवर प्रेम करतात. एकमेकांच्या अवयवांचा मसाज करणे, स्तनांना स्पर्श करणे, हळुवारपणे दाबणे आणि मारणे, गुप्तांगांना चुंबन घेणे आणि प्रेम देणे, सौम्य छेडछाड करणे, यासारख्या गोष्टी लैंगिक इच्छा वाढवतात.
4. तणावापासून दूर राहा
जेव्हा तणाव असतो तेव्हा सेक्ससाठी तयार राहणे अत्यंत कठीण असते. त्यामुळे तुमच्या तणावावर आणि चिंतांवर मात करण्याचा प्रयत्न करा. यासाठी ध्यान करा, तुमचे आवडते संगीत ऐका, उद्यानात फिरायला जा. तणाव नसेल तर चांगली आणि गाढ झोपही येईल.
5. मानसिकदृष्ट्या फिट रहा
मन आणि शरीराच्या समन्वयामुळे लैंगिक इच्छा निर्माण होते आणि बिघडते. म्हणूनच मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्ती खूप महत्त्वाची आहे. मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी आवश्यक असल्यास सेक्स थेरपिस्टची मदत घ्या. यामध्ये समुपदेशनाची खूप मदत होते.
6. वजन नियंत्रणात ठेवा
शरीराचे वजन नियंत्रित ठेवा. कारण जास्त वजन आणि लठ्ठपणामुळे स्त्री आणि पुरुष दोघेही कमी सेक्स ड्राइव्हच्या तक्रारी करू लागतात. त्यामुळे रोज योगा, जॉगिंग, एरोबिक, झुंबा किंवा व्यायाम करा, यामुळे वजन नियंत्रणात राहते आणि शरीर तंदुरुस्त राहते. यामुळे सेक्स ड्राईव्हही वाढेल आणि सेक्स करण्यात उत्साही राहील.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या तज्ज्ञांशी संपर्क साधा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.