Name Astrology : या नाव अक्षराची व्यक्ती असते अधिक जिद्दी, प्रेमात मिळते अपयश; तुमचं नाव अक्षर यात आहे का?

Personality Traits : ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीची जन्मतारीख, जन्मस्थान आणि जन्मवेळ ही राशीवरुन ठरवली जाते. राशीच्या आधारावर व्यक्तीचे नाव ठेवले जाते. जर तुमचे नाव K या अक्षरांनी सुरु होत असेल तर याचा स्वभाव आणि भविष्य कसे असेल जाणून घेऊया
Name Astrology
Name AstrologySaam Tv

People With Letter Names:

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या राशीप्रमाणे त्याचा स्वभाव आणि भविष्य वेगळे असते. एखाद्या व्यक्तींच्या नावावरुन त्याची ओळख ठरते. तुमच्या नावाच्या सुरुवातीचे पहिले अक्षर हे तुमच्या स्वभावाचा आरसा मानला जातो. यावरुन व्यक्तीचे व्यक्तीमत्त्व कळते.

ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीची जन्मतारीख, जन्मस्थान आणि जन्मवेळ ही राशीवरुन ठरवली जाते. राशीच्या आधारावर व्यक्तीचे नाव ठेवले जाते. जर तुमचे नाव K या अक्षरांनी (Letter) सुरु होत असेल तर याचा स्वभाव आणि भविष्य कसे असेल जाणून घेऊया

ज्योतिषशास्त्रानुसार क या अक्षरावरुन सुरु होणाऱ्या नावाची माणेस अधिक हट्टी आणि जिद्दी असतात. निरर्थक गोष्टींमधून चांगल्या गोष्टी शोधून काढतात. या स्वभावाचे लोक स्वत:च्या अटीवर आयुष्य जगतात. इतरांना मदत करायला सदैव तत्पर असतात. त्यांचा स्वभाव थोडा लाजाळू असतो पण जेव्हा एखाद्याला मित्र (Friend) बनवतात तेव्हा ते त्याच्यासाठी काहीही करायला तयार असतात. त्यांचा स्वभाव हा अतिशय मनमिळावू असतो.

Name Astrology
Vastu Tips : वास्तूशास्त्रानुसार स्वयंपाकघरात या वस्तू चुकूनही ठेवू नका, सुख-शांती होईल भंग; भासेल आर्थिक चणचण

क नावाच्या व्यक्ती मैत्री आणि प्रेमात नेहमीच फसतात. इंग्रजी अक्षर K ने सुरु होणारे लोक अधिक रोमँटिक स्वभावाचे असतात. कोणत्या व्यक्तीवर प्रेम करताना ते पारदर्शकपणे करतात. याचे वैवाहिक जीवन अतिशय सामान्य असते. स्वभाव थोडासा उद्धट असतो.

करिअरच्या (Career) दृष्टीकोनातून आयुष्यात याची खूप प्रगती होते. एखादे काम करायचे ठरवले तर ते पूर्ण करुनच सोडतात. म्हणून यश नेहमी त्यांच्या पायाजवळच असते. वैयक्तिक आयुष्याकडे ते अधिक लक्ष देत नाही परंतु, व्यावसायिक गोष्टीत अधिक रुची दाखवतात. कोणत्याही प्रकारची जोखीम पत्करण्यास ते नेहमी तयार असतात. व्यवसाय आणि नोकरीच्या ठिकाणी त्यांना अनेक नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न करत असतात.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com