Birth Control Pills : थांबा ! गर्भनिरोधक गोळ्या घेण्यापूर्वी 'या' गोष्टी करुन पहा, मासिक पाळीची चिंता राहणार नाही

आपल्या जोडीदारासोबत लैंगिक संबंध ठेवणे काही चुक नाही परंतु, योग्य खबरदारी नाही घेतली की आपल्याला पुढील समस्यांना सामोरे जावे लागते.
Birth Control Pills
Birth Control PillsSaam Tv

Birth Control Pills : हल्लीच्या पिढीतील जोडपे सगळ्या गोष्टी ठरवून करतात. ज्याचा त्यांना पुढील आयुष्यात फायदा देखील होतो. मग ते कुटुंबाचे असो किंवा कामाचे. त्यातील एक कुटुंबाचे नियोजन. आपल्या जोडीदारासोबत लैंगिक संबंध ठेवणे काही चुक नाही परंतु, योग्य खबरदारी नाही घेतली की, आपल्याला पुढील समस्यांना सामोरे जावे लागते.

बिघडलेली जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे आजकाल आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होत आहेत. तात्काळ आराम मिळावा म्हणून आपण काही वेळा औषधांचे सेवन करतो. परंतु, काही वेळा आपण ज्या औषधांचे सेवन करणार आहोत त्या आपल्या आरोग्यासाठी तितक्या फायदेशीर आहे का याची आपल्याला कल्पना नसते. काही वेळेस लैंगिक संबंध ठेवल्यानंतर अनेक महिला गर्भधारणा न होण्यासाठी काही विशिष्ट प्रकारच्या गोळ्यांचे सेवन करतात. ज्याचा आरोग्यावर (Health) परिणाम होतो. आपण ज्या औषधांचे सेवन करणार आहात त्यासाठी तुमचे शरीर तयार करणे आवश्यक आहे. त्यासाठी पोषणतज्ज्ञ राशी चौधरी यांनी काही टिप्स सांगितल्या आहेत ज्यामुळे आपल्याला पुढे होणारा त्रास टाळता येईल.

Birth Control Pills
Pregnancy Tips : तुमची गर्भधारणा अवघड की, सोपी ? महिलांमध्ये असणारी 'ही' पाच लक्षणे प्रजनन क्षमतेचं कार्य ठरवणार !

राशीने लिहिते, "मेटफॉर्मिन किंवा OCPs सारख्या कोणत्याही औषधे घेण्यापूर्वी 3 महिन्यांसाठी 4 हार्मोन हॅक करणे आवश्यक आहे." ती पुढे म्हणते की OCPs किंवा गर्भनिरोधकची समस्या ही आहे की तुम्ही गोळ्या घेतल्यानंतर किंवा त्यानंतर काय होते हे जाणून घ्या. कोणत्याही औषधांवर अवलंबून राहण्यापूर्वी 12 आठवडे या 4 गोष्टी करून पहा.

1. शरीरातील चरबी कमी करा

लैंगिक संबंध ठेवण्यापूर्वी किंवा गर्भनिरोधक गोळ्या खाताना आपण अधिक प्रमाणात फळे किंवा कर्बोदके जास्त असलेले इतर कोणतेही जेवण घेतो परंतु, अशावेळी आपण आपल्या शरीरातील वाढलेल्या चरबीवर अधिक लक्ष द्यायला हवे. पोषणतज्ज्ञ म्हणते की, फळे आरोग्यासाठी वाईट नाही परंतु, आपण झोपतून उठल्यानंतर आपले शरीर पुन्हा नवीन हार्मोन्स जोडण्याचा प्रयत्न करत असते.

2. आहारात बियांणाचा समावेश करा -

आजकाल बियाणांचा ट्रेंड वाढत चालला आहे. आपल्या आहारात लैंगिक संबंध ठेवण्यापूर्वी त्याच महिन्याच्या वेगवेगळ्या वेळी अंबाडी, भोपळा, तीळ आणि सूर्यफूलाच्या बियांचा समावेश असतो. हे विशिष्ट हार्मोन्स संतुलित करण्याच्या उद्देशाने आहे. आपल्या मासिक पाळीच्या पहिल्या सहामाहीत अंबाडी आणि भोपळ्याच्या बिया खाल्ल्या पाहिजेत आणि दुसऱ्या सहामाहीत सूर्यफूल आणि तिळाचा आस्वाद घेतला जाऊ शकतो. राशी सांगते की, बियाणे सायकल चालवल्याने तुमची मासिक पाळी संक्रमित होण्यावर चांगला परिणाम होतो. तसेच ती नियमित देखील येते.

Birth Control Pills
Pregnancy Tips : आई होण्याच्या काळात पुरुषांनी करावी 'ही' कामे, बाळ देखील होईल खुश !

3. दुधाच्या पदार्थांचे सेवन नको -

साधारणत: या दिवसात दुधाच्या पदार्थांचे सेवन करु नका. तसेच तीळ व काही हिरव्या भाज्यांमध्ये असणाऱ्या कॅल्शियमयुक्त पदार्थांचा आस्वाद घ्या. एक ते तीन महिने दुधाचे पदार्थ न खाल्ल्यास मासिक पाळी नियमित होण्यास मदत होईल.

4. ओमेगा 3 सप्लिमेंट घ्या-

मासिक पाळी नियमित येण्यासाठी औषधांऐवजी तुम्ही अनेक प्रकारचे पूरक आहार घेऊ शकता. यात आपण ओमेगा 3 फॅटी घेऊ शकतो. 1000 पेक्षा जास्त EPA असणारा सप्लिमेंट घेणे अधिक चांगले आहे. EPA 1000 पेक्षा जास्त असणे हा वजन कमी करण्यासाठी देखील फायदेशीर (Benefits) आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com