Punjab Tourist Places: थंड हवा अन् हिरवागार निसर्ग; हिवाळ्यात पंजाबमधील 'या' ठिकाणी नक्की भेट द्या

Punjab Tourist Places: पंजाब शहर हे सुट्टीमध्ये फिरण्यासाठी फार उत्तम आहे. या शहरात पर्यटकांना अनेक स्थळांना भेट देता येणार आहे.
Punjab
Punjabyandex
Published On

आता सध्या पर्यटक हिवाळ्याच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांच्या शोधात आहे. बाहेरच्या सुंदर वातावरणात फिरायला सर्वानांच आवडत असते. यामुळे नागरिकांच्या मनाला शांती मिळते, आणि माईंड देखील फ्रेश होतो. पर्यटकांच्या याच आवडीकडे लक्ष देत आम्ही पंजाब शहराची माहिती घेऊन आलो आहोत. या माहितीमुळे तुम्हाला काही प्रमुख स्थळांची माहिती मिळणार आहे.

भारतातील पंजाब ठिकाण फिरण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. याबरोबर लाखो पर्यटक या शहराला भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने जात असतात. पंजाब शहरामध्ये पर्यटकांना भेट देण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. पंजाब शहर त्याच्या मनमोहित दृश्यांनी आणि सुंदर वातावरणाने सर्वांना आकर्षित करत आहे. पंजाबमध्ये पर्यटकांना अनेक गोष्टी एक्सप्लोर सुद्धा करता येणार आहे. याबरोबर पर्यटकांना पंजाब शहराचा जवळून अनुभवता येणार आहे. पर्यटकांचा पंजाबमधील हा प्रवास खूप अविस्मरणीय ठरणार आहे.

Punjab
Tourism Places: मुबंईमधील ही निसर्गरम्य ठिकाणे पाहून मूड होईल मिनिटांत फ्रेश

अमृतसर

पंजाबमधील अमृतसर हे प्रमुख पर्यटन स्थळ आहे. दंतकथा आणि देशभक्तीसाठी ओळखले जाणारे हे पंजाबमधील एक धार्मिक स्थळ आहे. अमृतसरमधील हे सुवर्ण मंदिर त्याच्या सुंदर आकर्षणामुळे सर्व पर्यटकाचं लक्ष वेधून घेत आहे. हे पर्यटन स्थळ जालियनवाला बाग हत्याकांड आणि वाघा बॅार्डरसाठी प्रसिद्ध आहे. पंजाबमधील अमृतसर स्थाळाचा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांनी या स्थळाला नक्की भेट द्या.

चंदीगड

पंजाब शहरातील चंदीगड ही हरियाणा आणि पंजाबची राजधानी आहे. चंदीगडमध्ये पर्यटकांना रॅाक गार्डन, सुखाना तलाव, शांती कुंज, मोर्नी हिल्स, छतबीर प्राणी संग्रहालय, रोझ गार्डन यांसारख्या अनेक गोष्टी पाहता येणार आहे. याबरोबर चंदीगड शहर त्यांच्या अनेक सुंदर दृश्यांमुळे पर्यटकांना आकर्षित करत आहे. जर पर्यटक पंजाबमधील स्थळांना एक्सप्लोर करण्याचा विचार करत असतील, तर त्यांनी चंडीगड शहराला नक्की भेट द्या.

कपूरथला

पंजाबमधील कपूरथला स्थळ हे पॅरिस म्हणून ओळखले जाते. कपूरथला ठिकाणी गुरु नानक यांनी १४९९ ज्ञान प्राप्त केले होते. कपूरथला पॅलेस त्याच्या मनोरंजक दंतकथामुळे पर्यटकांना आकर्षित करत आहे. पर्यटकांना याबरोबर जगतजीत पॅलेस, जगतजीत क्लब, एलिसी पॅलेस, पंज मंदिर, कांजली वेटलँड यांसारख्या अनेक ठिकाणांना भेट देता येणार आहे. कपूरथला पर्यटकांना फिरण्यासठी एक योग्य ठिकाण आहे.

पटियाला

पटियाला शहर स्मारके आणि अर्थातच पंजाब यांसारख्या विविध वास्तुशैलींसाठी खूप प्रसिद्ध आहे. इतिहासप्रेमी पर्यटकांसाठी हे शहर भेट देण्यासाठी फार उत्तम आहे. याबरोबर हे शहर त्याच्या मोहक शांततेमुळे आणि सुंदर निसर्गामुळे पर्यटकाचं लक्ष वेधून घेत आहे. पटियालामध्ये पर्यटकांना मोतीबाग पॅलेस, फोर्ट अँड्रान, रंग महाल आणि काली मंदिर पाहता येणार आहे.

Punjab
Sri Lanka Tourism : श्रीलंकेत मनसोक्त आणि कमी खर्चात फिरता येणार; कसं वाचा संपूर्ण डिटेल्स

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com