
मानसूनचं हवामान बदलत असताना आपल्या आरोग्यावर त्याचा मोठा परिणाम होत असतो. विशेषतः यावेळी लिव्हरच्या समस्या वाढण्याची शक्यता अधिक असते. या दिवसांत पचायला जड, तेलकट आणि बाहेरचं अन्न टाळणं अत्यंत आवश्यक ठरतं. चुकीचं तेल खाण्यामुळे लिव्हरवर अनावश्यक ताण येतो, त्यामुळे फॅटी लिव्हर, सूज, लिव्हर एन्झाइम्स वाढणे यांसारख्या समस्या उद्भवतात. तुमचा आहार योग्य असणं गरजेचं आहे आणि त्यात उपयोगात येणारं तेल हा एक महत्त्वाचा घटक आहे. काही विशिष्ट नैसर्गिक तेलं लिव्हरचं डिटॉक्स करण्यास आणि सूज कमी करण्यास खूपच प्रभावी ठरतात.
ऑलिव्ह ऑइल हे लिव्हरच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम मानलं जातं. यामध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅट्स असतात, जे लिव्हरमध्ये साचलेलं फॅट कमी करतात. शिवाय यातील अँटीऑक्सिडंट घटक लिव्हरला स्वच्छ करण्यास मदत करतात. हे तेल थेट शिजवण्यासाठी न वापरता, सलाड ड्रेसिंग किंवा सौम्य तापमानात शिजवलेल्या पदार्थांसाठी वापरणं फायदेशीर ठरतं.
कोकोनट ऑइल म्हणजे नारळ तेलामध्ये MCTs (मध्यम साखळी ट्रायग्लिसराईड्स) असतात. हे घटक फॅटला ऊर्जा बनवण्याचे काम करतात आणि लिव्हरमध्ये चरबी साचण्यापासून बचाव करतात. फ्लेक्ससीड ऑइल हे ओमेगा-3 फॅटी अॅसिडचा उत्तम स्रोत आहे. हे तेल लिव्हरमधील सूज कमी करतं. मात्र, याचा वापर शिजवण्यासाठी न करता थंड पदार्थांमध्ये (जसे की सलाड्स) केला पाहिजे.
अवोकॅडो ऑइल हृदय आणि लिव्हर दोघांसाठी उपयुक्त आहे. याचा स्मोक पॉइंट जास्त असल्यामुळे आपण यामध्ये पदार्थ शिजवू शकतो. हे तेल कोलेस्ट्रॉल आणि लिव्हर एन्झाइम्सची पातळी संतुलित ठेवतं. थोड्या प्रमाणात सरसोंचं तेलसुद्धा वापरलं जाऊ शकतं. ओमेगा-3 आणि ओमेगा-6 फॅटी अॅसिड्स यामध्ये आढळतात जे रक्तप्रवाह सुधारतात आणि लिव्हर स्वच्छ ठेवण्यास मदत करतात.
दुसरीकडे काही तेलांचा वापर टाळणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. रिफाइंड तेल, वनस्पती घी किंवा ट्रान्स फॅटयुक्त पदार्थ हे लिव्हरच्या आरोग्यास अत्यंत घातक आहेत. जुने किंवा पुन्हा पुन्हा गरम केलेले तेल डीप फ्रायिंगसाठी वापरणं टाळावं. शेवटी, दररोजच्या आहारात २–३ चमचे तेल पुरेसं आहे. यापेक्षा जास्त प्रमाण लिव्हरवर ताण देऊ शकतं. शिजवण्याचे पर्याय बदला, उकडलेले, वाफवलेले किंवा ग्रिल केलेले अन्न लिव्हरच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते. मानसूनमध्ये लिव्हरचं संरक्षण करण्यासाठी योग्य तेल निवडणं ही पहिली पायरी ठरू शकते. त्यामुळे तुमच्या स्वयंपाकघरात कोणतं तेल आहे, हे तपासा आणि आरोग्यदायी निवड करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.