Best Mental Health Apps
Best Mental Health AppsSaam Tv

Best Mental Health Apps : अस्वस्थता, निद्रानाश आणि तणाव अशा समस्यांचा होतोय त्रास? हे अ‍ॅप्स तुम्हाला करतील मदत

Best Mental Health Apps In Smartphone : आजच्या काळात नैराश्य, अस्वस्थता, निद्रानाश, ताणतणाव यासारख्या समस्या सामान्य झाल्या आहेत.
Published on

Mental Health : आजच्या काळात नैराश्य, अस्वस्थता, निद्रानाश, ताणतणाव यासारख्या समस्या सामान्य झाल्या आहेत. रोजच्या धावपळीच्या जीवनात तुम्हाला एकटे, दुःखी आणि थकल्यासारखे वाटत असेल, तर काही अ‍ॅप्स तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. या लेखात आम्ही मानसिक आरोग्याशी संबंधित काही अ‍ॅप्सची माहिती देत ​​आहोत-

डिप्रेशन टेस्ट (Depression Test)

डिप्रेशन टेस्टद्वारे, आपण आपल्या मानसिक (Mental) स्थितीबद्दल माहिती मिळवू शकता. या अ‍ॅपमध्ये वापरकर्त्याची मानसिक स्थिती समजून घेण्यासाठी 9 प्रश्न तयार करण्यात आले आहेत. वापरकर्त्याला या प्रश्नांची उत्तरे एकाच वेळी द्यायची आहेत. प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर, वापरकर्ता त्याच्या स्क्रीनवर स्कोअर पाहू शकतो. यासोबतच डिप्रेशनचा प्रकार जाणून घेण्यासही मदत होते.

Best Mental Health Apps
Mental Health At Workplace : ऑफिसमधील वातावरणामुळे मानसिक आरोग्यावर होतो 'हा' परिणाम; जाणून घ्या कारणं

मूडफिट (Moodfit)

मानसिक आरोग्यासाठी मूडफिट अ‍ॅप हे 2020-2022 या वर्षातील सर्वोत्तम मानसिक आरोग्य (Health) अ‍ॅप्सपैकी एक मानले गेले आहे. हे स्मार्टफोन अ‍ॅप वापरकर्त्याची मानसिक स्थिती समजून घेण्यासाठी तसेच या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवण्यासाठी तयार करण्यात आले आहे. चांगल्या सवयी रुटीन बनवण्यासाठी अ‍ॅपमध्ये रिमाइंडर फीचर देखील आहे.

टॉकस्पेस (Talkspace)

टॉकस्पेस हे मानसिक आरोग्यासाठीही उत्तम अ‍ॅप आहे. या अ‍ॅपमध्ये विविध वयोगटातील वापरकर्त्यांना सहभागी होण्याची सुविधा मिळते. या प्लॅटफॉर्मवर वापरकर्त्याला समुपदेशनापासून ते थेरपीपर्यंतची सुविधा मिळते. एकूण निकालानंतरच, प्रत्येक वापरकर्त्यासाठी स्वतंत्र थेरपी तयार केली जाते.

Best Mental Health Apps
Mental Health : तुमच्या डोक्यात सतत विचार सुरु असतात ? याप्रकारे करा तुमच्या मनाला शांत

Wysa

Wysa हे मानसिक आरोग्यासाठीही लोकप्रिय अ‍ॅ (App) आहे. हे अ‍ॅप साध्या यूजर इंटरफेससह येते. या अ‍ॅपच्या मदतीने यूजर डिप्रेशन, कमी झोप, तणाव, बेचैनी यासारख्या समस्यांना सामोरे जाऊ शकतो. अ‍ॅप इन्स्टॉल करण्यासोबतच युजरला विविध समस्यांची यादी दिली जाते. सूचीतील कोणतीही एक समस्या निवडून अ‍ॅपचा वापर केला जाऊ शकतो.

मेडिटोपिया (Meditopia)

मानसिक आरोग्यासाठी मेडिटोपिया देखील वापरता येतो. या अ‍ॅपवर, वापरकर्त्याला मानसिक स्थितीशी संबंधित विविध समस्या सोडवण्याचा पर्याय मिळतो. या अ‍ॅपवर वापरकर्त्यासाठी काही प्रश्न तयार केले जातात, या प्रश्नांच्या आधारे वापरकर्त्यासाठी वैयक्तिक प्रोग्राम तयार केला जातो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com