फोटो काढायला तर सर्वांनाच आवडतात. फोटो चांगले येण्यासाठी सर्वात महत्तवाचा असतो तो चांगल्या कॅमेराचा फोन.चांगल्या कॅमेराचा फोन म्हणजे जास्त पैसे असा अनेकांचा समज असतो. पण आम्ही तुम्हाला तुमच्या बजेटमधील आणि चांगल्या कॅमेरा क्वालीटीच्या फोनबद्दल सांगणार आहोत.
बाजारात सध्या Techno या कंपनीची चर्चा आहे. अनेक लोक या कंपनीचे फोन वापरण्यास पसंती देतात. Techno Camon 20 Pro 5G हा नवीन फोन Flipkart वरुन १९,३९० रुपयांना खरेदी करु शकता.या फोनमध्ये 64 MP RGB OIS मूख्य कॅमेरा 2MP मॅक्रो कॅमेरा आणि 2MP बोकेह कॅमेरासह येतो. यात सेल्फीसाठी 32MP कॅमेरा आहे. Mediatek Dimensity 8050 प्रोसेसर देखील या फोनमध्ये उपलब्ध आहे.
फोनच्या कंपनीमध्ये Realme या कंपनीचे नाव अग्रेसर आहे. ही कंपनी नेहमीच नवीन नवीन फोन लॉन्च करत असतात. Realme Narzo 60 5G हा स्मार्टफोन Amazon वरून १७,९९९ रुपयांना खरेदी करू शकतात. हा फोन 64MP स्ट्रीट फोटोग्राफी कॅमेरा, 2MP पोर्ट्रेट कॅमेरा आणि 16MP सेल्फी कॅमेरासह येतो.
कॅमेराच्या बाबतीत ज्या कंपनीचा कोणी हात धरू शकत नाही. त्यातील एक म्हणजे One Plus. OnePlus Nord CE 3 Lite 5G हा फोन आता Amazon वरून 19,999 रुपयांना खरेदी करता येईल. हा फोन 108MP प्राथमिक कॅमेरा, 2MP डेप्थ असिस्ट लेन्स आणि 2MP मॅक्रो कॅमेरासह येतो. एक 16MP सेल्फी कॅमेरा त्याच्या समोर उपलब्ध आहे. यासोबतच यामध्ये Qualcomm Snapdragon 695 5G प्रोसेसर देखील उपलब्ध आहे.
Realme या कंपनीच्या फोनची बाजारात खूप मागणी आहे. ग्राहक Realme 10 Pro 5G हा स्मार्टफोन Rs 18,999 मध्ये खरेदी करू शकतात. हा फोन 108MP + 2MP रियर कॅमेरा आणि 16MP फ्रंट कॅमेरासह येतो. यासोबतच Qualcomm Snapdragon 695 5G प्रोसेसर आणि 5000mAh बॅटरी देखील येथे उपलब्ध आहे.
Samsung हा एक विश्वसनीय ब्रॅन्ड आहे. ग्राहक आता हा Samsung स्मार्टफोन Rs 18,999 मध्ये खरेदी करू शकतात. हा फोन 50MP+8MP+2MP रियर कॅमेरा सेटअप आणि 13MP फ्रंट कॅमेरासह येतो. तसेच, यात 6000mAh बॅटरी आणि ऑक्टा-कोर Exynos 1280 प्रोसेसर आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.