Benefits of Castor Oil in Belly Button: सांधेदुखीपासून आराम, कोमल त्वचा आणि...; नाभीत तेल टाकल्याने होतात 'हे' फायदे

oil in belly button: आयुर्वेदानुसार 'नाभी' हा आपल्या शरीराचा मध्य भाग आहे जो अनेक लहान-मोठ्या समस्यांपासून आपल्याला सुटका मिळवून देतो.
 castor oil in belly button
castor oil in belly button yandex
Published On

वाढत्या वयानुसार तुम्हाला थकवा, सांधेदुखी, हाडे कमकुवत होणे, त्वचेचा ग्लो जाणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत असेल. यासाठी शतकानुशतके आयुर्वेदात वापरलेली ही पद्धत तुम्ही वापरु शकता. आयुर्वेदानुसार 'नाभी' हा आपल्या शरीराचा मध्य भाग आहे जो अनेक लहान-मोठ्या समस्यांपासून आपल्याला सुटका मिळवून देतो. नाभी हा आपल्या शरीराचा एक महत्वाचा भाग आहे. ज्याच्याशीआपल्या शरीराचे सर्व भाग जोडलेले असतात.

अनेक जण रात्री झोपण्यापूर्वी नाभीमध्ये तेलाचे काही थेंब टाकतात. याचे महत्वाचे कारण म्हणजे, नाभीत तेल लावणे खूप फायदेशीर आहे आणि असे केल्याने अनेक समस्या दूर होतात. आयुर्वेदात नाभीत तेल टाकण्याच्या पद्धतीला 'पेकोटी पद्धत' म्हणतात. यासाठी तुम्ही नारळ, कडुलिंब, मोहरी किंवा ऑलिव्ह ऑईल यांचे तेल वापरु शकता. या तेलांचा वापर करुन तुम्ही ५ ते ७ मिनिटे बोटाच्या साहाय्याने मालिश करु शकता.

 castor oil in belly button
Milk Health Benefits: दुधात मिसळून प्या 'हे' पदार्थ, आरोग्य राहील तंदुरुस्त

नाभीत तेल टाकण्याचे फायदे:

पोटाशी संबंधित आजार

ज्या व्यक्तींना गॅस, ॲसिडिटी आणि पोट फुगण्याच्या समस्यांना सारखे सामोरे जावे लागत असेल त्यांनी हा उपाय करावा. पोटाची समस्या आपल्याला हैराण करुन सोडत असते. नाभीत तेल टाकल्याने या समस्यांपासून आपण दुर राहतो.

चेहऱ्यावरच्या पिंपल्सपासून मुक्ती

नाभीत तेल टाकल्याने त्वचेला खूप फायदा होतो. आपली त्वचा पिंपल्स, डाग, कोरडेपणा या समस्यांपासून दुर राहते. तेलामध्ये आवश्यकतेनुसार हेल्दी फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट्स असल्याने चेहरा चमकदार बनतो.

सांधेदुखी कमी होते

नाभीत तेल टाकल्याने सांधेदुखीचा त्रास कमी होतो. त्यासाठी काही दिवस झोपण्यापुर्वी नाभीत तेल टाकून मालीश करु शकता. याने पाय सुजन्याची समस्यादेखील कमी होईल.

मोहरीच्या तेलाचे फायदे

नाभीमध्ये मोहरीचे तेल टाकल्याने आपले मन शांत राहते . ज्यांना कमी झोप येते त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. याशिवाय ओठ फुटण्याच्या समस्या दूर करण्यासाठी आयुर्वेदात पेकोटी पद्धत फायदेशीर मानली जाते. हा उपाय तुम्ही वापरत असाल तर तुम्हाला चेहऱ्यात मोठ्या प्रमाणात बदल दिसतील. त्वचा चमकदार होईल. पुरेशी झोप मिळेल.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Edited By: Sakshi Jadhav

 castor oil in belly button
Brain Health: मेंदूच्या आरोग्यासाठी 'हे' भाजलेले पदार्थ ठरतात गुणकारी

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com