ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दुधामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते, त्याबरोबर दुध कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करत असते.
दरोरोज एक ग्लास दूध पिण्याचे आपल्या शरीरासाठी अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
दररोज एक कप गरम दुधात चिमूटभर दालचिनी पावडर मिसळून प्यायल्याने दुधाची चव सुधारतेच आणि रक्तातील साखरेवर नियंत्रण राहते.
चिया सीड्समध्ये ओमेगा ३ फॅटी ॲसिड यांसारखी अनेक जीवनसत्वे असतात. यामुळे चिया सीड्स कमी प्रमाणात दुधात मिसळल्याने शरीराला ऊर्जा मिळते.
दूधात मध टाकून प्यायल्याने दुधाची चव वाढते आणी घसादुखीपासूनही आराम मिळतो.
दुधामध्ये हळद टाकून प्यायल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे आहेत. हळद रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि शरीरातील जळजळ, सूजही कमी करत असते.
दररोज सकाळी दुधामध्ये बदाम, काजूची पावडर मिसळून प्यायल्याने दुधाची चव वाढते आणि हृदय देखील खूप चांगले राहते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: रोज एक सफरचंद, अनेक आजार राहतील दूर