घरातील Bedsheet देते अनेक आजारांना निमंत्रण; अभ्यासातून मोठा खुलासा

Bedsheet Hygiene in Marathi : तुम्ही नेहमी नीटनेटके आणि स्वच्छ कपडे परिधान करत असाल. त्याचबरोबर तुम्हाला रोज लागणाऱ्या घरातील वस्तूही स्वच्छ ठेवल्या पाहिजे. अन्यथा अनेक आजारांना निमंत्रण मिळू शकतं.
Bedsheet Hygiene
Bedsheet Hygiene Saam tv
Published On

Bedsheet Hygiene :

तुम्ही नेहमी नीटनेटके आणि स्वच्छ कपडे परिधान करत असाल. त्याचबरोबर तुम्हाला रोज लागणाऱ्या घरातील वस्तूही स्वच्छ ठेवल्या पाहिजे. अन्यथा अनेक आजारांना निमंत्रण मिळू शकतं. आपण पाहिलं तर काही लोक घरात एकच चादर अनेक आठवडे वापरतात. काही जण त्या चादरीला डाग दिसत नाही, तोपर्यंत वापरतात. (Latest Marathi News)

तुम्ही महिने महिने एकच बेडशीट वापरत असाल तर तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. तुम्ही तीन ते चार महिन्यांनी बेडशीट बदलली पाहिजे. या बेडशीटला धुतली पाहिजे. एखादी बेडशीट किती दिवस वापरली पाहिजे? ठराविक आठवड्यांनी बेडशीट बदलली पाहिजे. अन्यथा अनेक आजारांना सामोरे जावे लागू शकतं.

Bedsheet Hygiene
Tirupati Balaji Travel Guide: तिरुपती बालाजीचं दर्शन करण्याची इच्छा आहे? वेळेपासून ते तिकीटापर्यंत सर्व माहिती एका क्लिकवर

एखादी बेडशीट किती दिवस वापरली पाहिजे?

२०२१ साली डनलपिलोंद्वारे करण्यात आलेल्या अभ्यासातून मोठा खुलासा करण्यात आला आहे. १०.२ टक्के लोक २ महिन्यांनी घरातील चादर बदलतात. तर ४४.९ टक्के पेक्षा कमी लोक हे दोन आठवड्यांनी बेडशीटमधील चादर बदलतात.

या व्यतिरिक्त २०१२ मध्ये नॅशनल स्लीप फाऊंडेशनने याबाबत सर्व्हे केला होता. या सर्व्हेमध्ये खुलासा झाला की, अनेक लोक दोन आठवड्यांनी खोलीतील चादर बदलतात.

तज्ज्ञांच्या मते कमीत कमी एका आठवड्यांनी घरातील चादर बदलली पाहिजे. चादर न बदलल्यास तुम्ही आजारी पडू शकता. चादरीवर धुळीचे कण जमा होतात, त्यामुळे या धुळीच्या कणामुळे व्यक्ती आजारी पडण्याची शक्यता असते.

Bedsheet Hygiene
Drinking Hot Water In Summer : उन्हाळ्यात गरम पाणी प्यावे का? जाणून घ्या

प्रत्येक आठवड्याला चादर बदला

एलर्जी

तुम्हाला त्वचेसंबंधित काही समस्या असतील तर तुम्ही एक-दोन दिवसांनी चादर बदलली पाहिजे. चादर बदलली नाही तर त्वचेशी संबंधित एलर्जीची समस्या वाढू शकतात.

अधिक घाम येणे

काही लोकांना झोपताना अधिक घाम येतो. या व्यक्तीच्या लोकांच्या घामातूनही वास येतो. तुम्हाला झोपताना घाम येत असेल तर तुम्ही नियमितपणे चादर बदलायला हवी.

पाळीव प्राणी

तुमच्या घरात पाळीव प्राणी असेल तर दररोज घरातील वापरण्याच्या चादरी बदलल्या पाहिजे. तुमचा एखादा पाळीव प्राणी बेडवर येऊन झोपत असेल तर तुम्ही चादर गरम पाण्याने धुतली पाहिजे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या हेल्थ एक्सपर्टशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com