Look Younger : सर्जरी न करता वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही दिसाल तरुण; फॉलो करा या टिप्स

Beauty Tips : निरोगी आहार म्हणजे फळं, हिरव्या पाले भाज्या जास्त खाव्यात. त्याने तुम्ही जास्त आजारी पडणार नाही, तंदुरुस्त राहाल तसेच तुमचं वाढलेलं वय पटकन तुमच्या चेहऱ्यावर दिसणार नाही.
Look Younger
Look YoungerSaam TV

वाढत्या वयासह आपल्या शरीरात विविध बदल होतात. तसेच आपल्या चेहऱ्यावर आणि त्वचेवर देखील बदल दिसतात. वय वाढल्यावर स्किन लूज पडते. तारुण्यात चेहरा जसा टवटवीत असतो तसा पन्नाशी ओलांडल्यानंतर राहत नाही. त्यामुळे आज वाढतं वय चेहऱ्यावर दिसू नये यासाठी काही टिप्स जाणून घेणार आहोत.

Look Younger
Hingoli Water Crisis : पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बनला गंभीर; हिंगोलीच्या सिद्धेश्वर धरणात पाण्याचा मृतसाठा

पौष्टिक आहार :

आपलं वय आपल्या चेहऱ्यावर दिसूनये यासाठी आपण निरोगी राहणंही गरजेचं आहे. त्यासाठी निरोगी आहार म्हणजे फळं, हिरव्या पाले भाज्या जास्त खाव्यात. त्याने तुम्ही जास्त आजारी पडणार नाही, तंदुरुस्त राहाल तसेच तुमचं वाढलेलं वय पटकन तुमच्या चेहऱ्यावर दिसणार नाही.

पुरेशी झोप घ्या

पुरेशी झोप होणं गरजेचं असतं. पुरेशी झोप न झाल्याने आपल्या डोक्यावरचा ताण वाढतो. प्रत्येक व्यक्तीला ७ ते ८ तासांची झोप मिळणे महत्वाचं आहे.

नियमी व्यायाम करा

नियमीत व्यायाम केल्याने देखील आपलं आरोग्य सुधारतं. तसेच वजन वाढत नाही. वजन वाढल्यावर ती व्यक्ती लगेचच वृद्ध दिसू लागते. त्यामुळे तुमचंही वजन जास्त असेल तर तुम्ही तुमच्या वयापेक्षा २ वर्ष आणखी मोठे दिसता. चेहऱ्यावर आपलं वय दिसूनये यासाठी नियमीत व्यायाम करा.

धुम्रपान करू नका

अनेक मुलांना आणि मुलींना फार कमी वयात विविध व्यसने जडतात. या व्यसनांपासून आपली सुटका व्हावी यासाठी तुम्ही स्वत: मनापासून प्रयत्न केला पाहिजे. कारण मद्यपान आणि धुम्रपान केल्याने आपल्या आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होतो.

जास्त पाणी प्या

तुमच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी जास्त झाल्याने देखील आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. पाणी कमी पिणाऱ्या व्यक्तीला पोटासंबंधी काही समस्या निर्माण होतात. तसेच चेहऱ्यावर देखील याचा परिणाम दिसून येतो. त्यामुळे जास्त पाणी पिण्याची सवय ठेवा.

Look Younger
Yavatmal Water Supply News : यवतमाळकरांना मिळतेय आठ दिवसातून एकदाच पाणी, जाणून घ्या निळाेणासह चाेपडा धरणाचा पाणीसाठा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com