Health Tips: शरीर कमावण्यासाठी व्यायाम नाही केला तरी चालेल, मात्र 'हे' काम नक्की करा

'या' व्यायामाचा आणि अकाली मृत्यूचा थेट संबंध असल्याचं एका अहवालातून समोर आलं आहे. हा व्यायाम (Exercise) केल्याने आपला मृत्यू 53 टक्त्यांनी घटतो असं शास्त्रज्ञांनी सिद्ध केलं आहे.
Health Tips For a Healthy Life
Health Tips For a Healthy LifeSaam TV
Published On

मुंबई : चालण्याचा व्यायाम शरीरासाठी चांगला असतो असं डॉक्टर आपणाला सतत सांगत असतात. तसंच जिमच्या व्यायामापेक्षा चालणं आरोग्यासाठी कधीही चांगलं आहे. याच चालण्याच्या व्यायामाचा आणि अकाली मृत्यूचा थेट संबंध असल्याचं एका अहवालातून समोर आलं आहे. चालण्याचा व्यायाम (Walking Exercise) केल्याने आपला मृत्यू 53 टक्त्यांनी घटतो असं शास्त्रज्ञांनी सिद्ध केलं आहे. आपण रोजच्या राहणीमानामध्येही (Even in living standards) माणसांने रोज चाललं पाहिजे असं म्हणतो.

'आता चालणे चालणे हाची मार्ग' याचा अर्थ जो चालतो तोच काहीतरी करु शकतो म्हणजे काय तर चालण्याची कृती करताना आपणाला आळसाला मारावं लागत आणि चालणे अशी अशी क्रिया आहे तुमचं सर्व शरीर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात असते साहजिकच यामुळे सर्व शरीराचा भरपूर व्यायाम होतो. आपल्या संस्कृतीमध्ये 'चरैवेति चरैवेति' असं म्हटलेले आहे. आता आधुनिक विज्ञानही म्हणते की रोज चालण्याचा व्यायाम करणाऱ्या माणसाचा अकाली मृत्यू (Premature Death) होण्याचा धोका 53 टक्क्यांनी घटल्याचं सांगत आहे.

अमेरिकेच्या मॅसाच्युसेटस् युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे. 'लान्सेट' या वैद्यकीय वर्तमानपत्रात या बद्दलची माहिती देण्यात आली आहे. अमेरिकेच्या मॅसाच्युसेटस् युनिव्हर्सिटीमधील संशोधनासाठी 4 महाद्विपांमधील 50 हजार लोकांवर झालेल्या 15 पाहण्यांचा अभ्यास करण्यात आलाय. या डेटामुळे असं स्पष्टपणे दिसून आलं आहे की, रोजच्या रोज नियमित चालण्याचा व्यायाम केल्याने लोकांचे आरोग्य (Health) चांगले राहते आणि त्यांचे आयुष्यही वाढते.

पहा व्हिडीओ -

या 50 हजार लोकांना चार गटांत विभागण्यात आले. त्यापैकी पहिला गटातील लोक रोज सरासरी 3500 पावले चालले तर दुसरा 5800 पावले, तिसरा 7800 आणि चौथा 10,900 पावले चालणाऱ्या लोकांचा गट होता. जे 3 गट सर्वाधिक सक्रिय होते त्यांच्यामध्ये मृत्यूचा धोका 40 ते 53 टक्के कमी असल्याचे दिसून आलं आहे. मात्र, दररोज 10 हजार पावले चालण्याची गरज नसल्याचही वैज्ञानिकांनी म्हटलं आहे. जर 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांनी 8 ते 10 हजार पावले तर साठीपेक्षा जास्त वय असणाऱ्या लोकांनी रोज 6 ते 8 हजार पावले चालले तरी त्यांना लाभ होईल, मात्र, चालण्याच्या गतीचा मात्र दीर्घायुष्याशी कोणताही संबंध नसल्याचं संशोधकांनी म्हटलं आहे.

(टीप- वरील व्यायाम करण्यापूर्वी तुमच्या शरारासाठी किती पावलं चालण योग्य आहे याचा सल्ला डॉक्टरांकडून नक्की घ्या)

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com