Bank Strike: बँकेची कामं एका दिवसात करा पूर्ण! सलग 4 दिवस बँका बंद राहणार

आपली महत्वाची बँकांची काम असतील तर ती आज आणि उद्यापर्यंत लवकरच उरकून घ्या
Bank
BankSaam Tv
Published On

आपली महत्वाची बँकांची काम असतील तर ती आज आणि उद्यापर्यंत लवकरच उरकून घ्या. कारण परवा २६ मार्चपासून सलग ४ दिवस बॅंका बंद राहणार आहेत. यामुळे सर्वसामान्यांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २८ आणि २९ मार्च या दिवशी बॅंक (Bank) कर्मचारी संघटनांचा संप आणि २६ आणि २७ मार्च या दिवशी बॅंकांना सुट्टी असल्यामुळे मोठा परिणाम होणार आहे. ऐन मार्च महिन्यामध्ये संप होत असल्याने सामान्य ग्राहकांबरोबरच (customers) बॅंकिंग क्षेत्राला देखील फटका बसण्याची शक्यता आहे.

हे देखील पहा-

या संपामुळे स्टेट बॅंक आॅफ इंडिया (SBI) आणि इंडियन ओव्हरसीज बॅंक सोडता इतर सर्व बॅंकांचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे. ५ लाखांपेक्षा अधिक बॅंक कर्मचारी आणि अधिकारी संपात सहभागी होणार असल्याचा संघटनांचा दावा करण्यात आला आहे.बॅंकांच्या खासगीकरणाला विरोध, बॅंकांमधील कंत्राटीकरण, बॅंकेतील कामाचे आऊटसोर्सिंग आणि जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या प्रमुख मुद्द्यांवर बॅंक कर्मचारी संपाच्या तयारीमध्ये आहेत.

या बरोबरच लोकसभेतील (Lok Sabha) अधिवेशनात बॅंकिंग कायदा दुरुस्ती विधेयक मांडल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देखील संघटनांनी दिला आहे. ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉईज असोसिएशन, एआयबीओए, बेफी आणि महाराष्ट्र स्टेट बॅंक एम्प्लॉईज फेडरेशन संपात सहभागी होणार आहे. सहकारी बॅंका, काही विदेशी बॅंका, जुन्या खासगी बॅंका, ग्रामीण बॅंकामधील कर्मचारी देखील संपात सहभागी होणार असल्याचा संघटनांचा दावा यावेळी केला आहे.

Bank
चिंताजनक! देशात गेल्या 24 तासांत 1 हजार 938 नवीन कोरोना रुग्णांची नोंद 67 मृत्यू

ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कन्फेडरेशन (AIBOC) ने सरकारी बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधामध्ये आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. हा संप देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना वाचवण्यासाठी असल्याचे बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी सांगितले आहे. बँकांच्या खासगीकरणामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या बँकिंग अधिकाराचे हनन होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सार्वजनिक क्षेत्रामधून बँक उद्योग गेल्यास याचा मोठा फटका सामान्य नागरिकांना जास्त प्रमाणात बसणार आहे. या देशात सामान्य नागरिकांचे बँकिंग अधिकार आणि त्याद्वारे आर्थिक विकासासाठी मिळणाऱ्या सोयी सवलती वाचवण्यासाठी असल्याचे बँक कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com