दिवाळीला सुरुवात झाली असून मोठ्या उत्साहात देशभरात दिवाळी साजरी केली जातेय. हिंदू धर्मात या सणाला मोठं महत्त्व देण्यात आलं आहे. आज ३१ ऑक्टोबर असून आजच्या दिवशी हा सण साजरा करण्यात येणार आहे. आजच्या दिवशी लक्ष्मी आणि गणेश यांची पुजा केली जाते.
मात्र शास्त्रानुसार, या काळात काही गोष्टींची काळजी घेणं फार महत्त्वाचं असतं. दिवाळीत काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. या काळात जर तुम्ही नियमांचं पालन केलं नाही तर देवी लक्ष्मीचा कोप होऊ शकतो. जाणून घेऊया दिवाळीच्या दिवशी काय केलं पाहिजे आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत.
दिवाळीत घरात कोणतीही घाण ठेवू नये. अशा ठिकाणी लक्ष्मी देवी वास करत नाही.
दिवाळीच्या मुहूर्तावर घरी आलेल्या पाहुण्यांना रिकाम्या हाताने पाठवू नये
दिवाळीत जुगार खेळू नये. तसंच दारू पिणं किंवा आणि मसालेदार पदार्थ खाऊ नये
दिवाळीत कोणाकडूनही कर्ज घेऊ नये.
या दिवसांत कोणत्याही महिलेचा अपमान करू नका.
या दिवशी कोणाशीही भांडण करू नये.
दिवाळीनिमित्त संपूर्ण घराची नीट स्वच्छता करावी
दिवाळीच्या प्रत्येक दिवशी घरात रांगोळी आणि फुलांनी सजवा.
शुभ मुहूर्तावर लक्ष्मी आणि गणेशाची पूजा करा.
दिवाळीच्या निमित्ताने वाईट सवयी सोडून चांगल्या कृती आणि सवयी अंगीकारा.
या दिवसांत दान-धर्म करणं शुभ मानलं जातं.
डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.