ATM Alert : एटीएममधून पैसे काढताना 'या' चुका करु नका; अन्यथा, बळी पडाल फसवणूकीला

बरेचदा आपण एटीएममधून पैसे काढताना चुका करतो.ज्यामुळे आपले अंकाउट खाली होते.
ATM Alert
ATM AlertSaam Tv
Published On

ATM Alert : हल्ली फसवणुकीच्या घटना वारंवार आपल्यासमोर येत आहे. यामुळे आपल्या सगळ्या गोष्टींची खबरदारी घ्यावी लागणार आहे. बरेचदा आपण एटीएममधून पैसे काढताना चुका करतो.ज्यामुळे आपले अंकाउट खाली होते.

एटीएम फसवणुकीच्या घटना रोजच पाहायला मिळतात आणि त्याची माहिती असूनही आपण चुका करतो आणि त्यांच्या जाळ्यात अडकतो. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही एटीएम फ्रॉड टाळायचे असेल तर या गोष्टींची काळजी घ्या.

ATM Alert
ATM Card : एटीएम कार्डचा पीन चुकीचा टाकला ? ब्लॉक झाले तर घाबरु नका, त्वरीत 'हे' करा

1. एटीएम पिन

एटीएममधून पैसे काढताना एटीएम पिनचा वापर काळजीपूर्वक करा. तसेच, गुप्तपणे पिन प्रविष्ट करा. लक्षात ठेवा की, तुम्ही एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलात तेव्हा तेथे कोणीही नसावे. तेथे इतर कोणी असल्यास, त्याला बाहेर जाण्यास सांगा आणि संशय असल्यास, त्या एटीएममधून ताबडतोब बाहेर या.

2. एटीएम पिन आणि कार्ड कोणालाही देऊ नका

घाईघाईत पैसे काढण्यासाठी अनेक वेळा आपण आपल्या मित्रांना किंवा नातेवाईकांना एटीएम कार्ड आणि पिन देतो. असे करणे अल्पावधीत सोयीचे असू शकते, परंतु दीर्घकाळात तुमची फसवणूक होऊ शकते. अशी चूक करू नका. आजकाल अशा घटनाही समोर येत आहेत ज्यात जवळच्या लोकांनीच लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. काही कारणास्तव तुम्हाला एटीएम पिन आणि कार्ड कुणाला द्यायचे असल्यास ताबडतोब कार्डचा पिन बदला आणि बँक स्टेटमेंट पहा.

3. एटीएम सुरक्षा तपासा

एटीएममधून पैसे (Money) काढताना घाई करू नका. सर्वप्रथम, एटीएमच्या आतील बाजूस एक नजर टाका आणि कोणताही छुपा कॅमेरा बसवला आहे की नाही हे एका नजरेने पहा. एटीएम कार्ड स्लॉट देखील तपासा कारण स्कॅमर कधीकधी एटीएममध्ये क्लोनिंग उपकरणे किंवा कार्ड रीडर चिप्स स्थापित करतात. हे उपकरण एटीएम कार्डचा डेटा चोरते यामुळे तुम्ही फसवणुकीला बळी पडतात. अशा परिस्थितीत जर काही शंका असेल तर ते एटीएम वापरू नका.

4. एटीएम पिन बदलत रहा

तुम्ही तुमचा एटीएम पिन वेळोवेळी बदलत राहिल्यास तुमच्यासोबत फसवणूक (Fraud) होण्याची शक्यता खूप कमी होते. यावर बँक तुम्हाला सल्लाही देते. तसेच, विशिष्ट पॅटर्न किंवा तत्सम संख्यांचा पिन बनवू नका. तुमची जन्मतारीख, मोबाईल नंबरचे अंक, 0000, 1111 सारखे अंक वापरू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com