Astro Tips : साखर बदलेल तुमचे भाग्य; फक्त 'हे' उपाय करा, होईल धनलाभ

असे अनेक उपाय ज्योतिष शास्त्रात सांगण्यात आले आहेत, जे केल्याने व्यक्ती समस्यांपासून मुक्त होऊ शकते
Astro Tips
Astro TipsSaam Tv
Published On

Astro Tips : साखरेशिवाय गोडाच्या पदार्थाला महत्त्व नाही. आपल्या स्वयंपाकघरात साखर ही सहज मिळते. चहापासून ते अनेक गोडाचे पदार्थ बनवताना साखरेचा वापर आपण हमखास केला जातो. परंतु, या साखरेचा फक्त वापर गोडाचे पदार्थ बनवताना नाहीतर, ज्योतिषशास्त्रातही अधिक महत्त्व आहे.

घरामध्ये अशा अनेक गोष्टी वापरल्या जातात ज्या ज्योतिष शास्त्रानुसार उपायांमध्ये वापरल्यास अनेक समस्यांपासून मुक्तता मिळते. स्वयंपाकघरात वापरल्या जाणार्‍या साखरेमुळे अन्नपदार्थांमध्ये गोडवा येतो. तसेच साखरेचे उपायही माणसाचे जीवन गोड करतात.

Astro Tips
Horoscope 2023 : येणाऱ्या 2023 च्या वर्षात चमकेल 'या' 5 राशींचे भविष्य, अपूर्ण स्वप्न देखील होतील पूर्ण !

असे अनेक उपाय ज्योतिष शास्त्रात सांगण्यात आले आहेत, जे केल्याने व्यक्ती समस्यांपासून मुक्त होऊ शकते. आज आपण साखरेशी (Sugar) संबंधित अशा काही उपायांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळू शकते.

साखरेशी संबंधित काही महत्त्वाचे उपाय

  • ज्योतिष शास्त्रानुसार जर तुम्हाला ग्रहांपासून मुक्ती हवी असेल तर सकाळी उठून आंघोळीनंतर भगवान सूर्याला साखर अर्पण करा.

  • कष्ट करूनही यश मिळत नसेल तर मैदा आणि साखरेची भाकरी करून कावळ्यांना खाऊ घाला. असे केल्याने व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळते आणि पैशाशी संबंधित समस्याही दूर होतात.

  • ज्योतिषशास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीला सतत नुकसान होत असेल तर तांब्याच्या ग्लासमध्ये साखर आणि पाणी (Water) विरघळवून नियमित प्या. यामुळे कुंडलीत सूर्य ग्रह बलवान होतो आणि व्यक्तीला व्यवसायात प्रगती होते.

  • जर एखादी व्यक्तीला शनीची साडेसात असेल आणि शनीच्या महादशामुळे खूप त्रासलेली असेल तर मुंग्यांना सुके खोबरे आणि साखर खाऊ घाला. हा उपाय केल्याने व्यक्तीला शनीची साडेसाती आणि शनिदेवापासून लवकरच आराम मिळतो.

  • जर तुम्ही एखाद्या कामासाठी बाहेर जात असाल आणि त्यात यश मिळवायचे असेल तर रात्री तांब्याच्या भांड्यात साखर आणि पाणी विरघळवून ठेवा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी घरातून बाहेर पडण्यापूर्वी ते पाणी प्या. असे केल्याने व्यक्तीच्या कामात यश मिळण्याची शक्यता वाढते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com