Arthritis Remedies : तुम्हालाही गुडघे दुखीचा त्रास होतोय ? खांदाही दुखतोय का ? हा सांधीवात नाही ना, जाणून घ्या

सांधेदुखीच्या त्रासापासून सुटका कशी मिळवाल ?
Arthritis Home Remedies
Arthritis Home RemediesSaam Tv
Published On

Arthritis Remedies : हल्ली कामाच्या व्यापामुळे व बदलेल्या जीवनशैलीमुळे आपल्याला पाठीचा किंवा मानेचा त्रास होऊ लागतो. सतत एकाच जागी बसून काम केल्याने आपले पाय व गुडघे देखील दुखू लागतात.

वाढत्या वयानुसार होणारा संधिवात हा आजार हल्ली तरुण पिढीमध्ये देखील दिसून येत आहे. संधिवात हा वाढत्या वयानुसार होणारा त्रास आहे. यात सांधेदुखी आणि हाडांमध्ये वेदना होणे, जडपणा आणि मुंग्या येणे हे संधिवाताचे लक्षण आहे.

वयाच्या पन्नाशी नंतर संधिवाताचा त्रास सुरू होणे साहजिक आहे, पण सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे कमी वयात हा त्रास होऊ लागला आहे. सांधेदुखीमध्ये हाडांची झीज होऊन हालचाल करताना वेदना होतात. या वेदनांपासुन आराम मिळण्यासाठी हे घरगुती उपचार आपण करु शकतो.

हे उपाय करुन पहा -

Arthritis Home Remedies
Hair Falls Problem : शॅम्पूचा वापर केल्यानंतरही केस गळताय? हा आजार तर नाहीना, जाणून घ्या

१. आले -

Ginger
GingerCanva

आल्यामध्ये वेदनाशामक गुणधर्म असल्यामुळे संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो. आल्यातील गुणधर्मामुळे सांधेदुखीपासून आराम मिळतो. वेदना कमी होण्यासाठी दिवसातून ३ वेळा ६ चमचे सुंठ पावडर, ६ चमचे काळे जिरे पावडर आणि ३ चमचे काळी मिरी पाण्यात मिसळून घ्यावे.

२. अॅपल सायडर व्हिनेगर -

apple cider vinegar
apple cider vinegarCanva

अॅपल सायडर व्हिनेगरच्या उपयोगाने सांधेदुखी कमी होते. याचा उपयोग शरीरातील कॅल्शियम, खनिजे, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस हे गुणधर्म भरपूर प्रमाणात आढळतात. दररोज सकाळी १ चमचा अॅपल सायडर व्हिनेगर, मध गरम पाण्यात मिसळून घ्यावे याने आपल्याला खूप फायदा होऊ शकतो.

३. मोहरीचे तेल -

Mustered Oil
Mustered OilCanva

स्वयंपाकघरात (Kitchen) वापर असणाऱ्या मोहरीचा आपण वापर करु शकतो. सांधेदुखीच्या या आजारावर मोहरी फायदेशीर (Benefits) ठरु शकते. सांधेदुखीसाठी मोहरीचे तेल वापरल्याने सांध्यातील रक्तप्रवाह सुधारतो. यामुळे आपल्याला आराम मिळू शकतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com