Pneumonia Causes: बदलेले हवामान व थंडीमुळे मुलांच्या आरोग्यावर सहज परिणाम होतो. हिवाळ्याच्या ऋतूमध्ये सर्वांना सर्दी, ताप, खोकला यांसारख्या समस्या उद्भवतात. सध्या तापमानातही मोठी घट झाली आहे.
हिवाळ्यात खोकला, ताप किंवा श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे हवा फुफ्फुसात जाते आणि मुलांमध्ये न्यूमोनियाचा धोका वाढतो. न्यूमोनिया हा श्वसनाचा गंभीर आजार आहे. हा आजार बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे होतो. त्याचा प्रभाव इतर ऋतूंच्या तुलनेत हिवाळ्यात अधिक जाणवतो.
हिवाळ्यात थंड हवेमुळे व्हायरल इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. तसेच हवेची गुणवत्ताही खालावल्यामुळे याचा धोका वाढला आहे. अशा वेळी मुलांमध्ये न्यूमोनियाचा धोका वाढतो, त्यामुळे लक्षणांकडे (Symptoms) दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे गरजेचे आहे.
सुरुवातीची लक्षणे कोणती?
हिवाळ्याच्या हंगामात मुलांना खोकला, सर्दी, ताप आणि विषाणूजन्य संसर्ग होण्याची शक्यता असते. सर्दी-खोकला चार ते पाच दिवसात बरा होतो.
पण एक वर्ष ते पाच वर्षांच्या मुलांचा सर्दी-खोकला ४-५ दिवसांत बरा झाला नाही तर हा संसर्ग गंभीर होऊ शकतो.
त्याचे रूपांतर न्यूमोनियामध्ये होते. वेळीच निष्काळजीपणा न केल्यास ते जीवघेणे ठरू शकते. त्यामुळे मुलांची (Child) डॉक्टरांकडून (Doctor) वेळेवर तपासणी करून घ्या.
निमोनियाची लक्षणे काय आहेत?
ताप आणि खोकला
श्वास घेण्यास त्रास, जलद श्वास घेणे
श्वास घेताना छातीत दुखणे
उलट्या होणे, भूक न लागणे
शरीर निर्जलीकरण
निळे ओठ किंवा नखे
न्यूमोनियाचा धोका कोणाला जास्त आहे?
हृदयाची समस्या किंवा विकार
हृदयात जन्मजात छिद्र
कोणत्याही श्वसन समस्या
अकाली जन्मलेली आणि कमी वजनाची बाळं
इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड मुले
या गोष्टी लक्षात ठेवा
मुलांना थंडीपासून वाचवण्यासाठी त्यांना उबदार कपडे घाला
पिण्यासाठी कोमट पाणी आणि ताजे अन्न द्या
फ्रीजमध्ये ठेवलेले थंड दूध देणे टाळा
मुलांना हंगामी फळांचे (Fruit) रस आणि भाज्यांचे सूप द्या
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.