Diabetes Symptoms
Diabetes SymptomsSaam Tv

Diabetes Symptoms : तुम्हालाही सतत लघवीला होतेय ? असू शकतो हा गंभीर आजार, जाणून घ्या सविस्तर

Diabetes Symptoms Check : एक सामान्य व्यक्ती दिवसातून आठ ते दहा वेळा लघवी करतो.

Symptoms Of Diabetes : एक सामान्य व्यक्ती दिवसातून आठ ते दहा वेळा लघवी करतो. पण त्यापेक्षा जास्ती वेळा लघवी येत असेल तर त्या मागचे कारण जाणून घेणे गरजेचे असते सामान्यपणे जर तुम्ही जास्त पाणी पीत असाल तर असे होऊ शकते. तसेच हिवाळा किंवा पावसाळ्यात या समस्या अधिक होत असतात. त्यामुळे आपण याकडे जास्त लक्ष देत नाही परंतु जर असे वारंवार होत असेल तर याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. 

Diabetes.co.uk या वैद्यकीय वेबसाइटनुसार, ज्या लोकांना जास्त लघवी होते किंवा जे वारंवार लघवीला जातात त्यांना टाइप 1 आणि 2 मधुमेहाचा धोका असू शकतो. जे लोक वारंवार लघवीला जातात किंवा ज्या लोकांना दिवसातून तीन लिटरपेक्षा जास्त लघवी येते, त्यांना मधुमेहाचा (Diabetes) धोका असू शकतो.

Diabetes Symptoms
Diabetes Control Tips : मधुमेहिंनो उन्हाळ्यात साखर नियंत्रीत ठेवायची आहे? तर 'या' गोष्टी रोज करा

मधुमेहामुळे हृदयविकार, पक्षाघात, मूत्रपिंडाचा त्रास, डोळ्यांच्या समस्या इ. अलीकडेच, Diabetes.co.uk या वैद्यकीय वेबसाइटने माहिती दिली आहे की मधुमेह असलेल्या लोकांमध्ये मूत्राशी संबंधित एक लक्षण दिसून येते. जर कोणाला हे लक्षण (Symptoms) दिसले तर त्याने त्वरित तज्ज्ञांना भेटावे.

मधुमेह हा एक आजार (Diasease) आहे जो मानवी रक्तातील ग्लुकोज निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त झाल्यास होतो. इन्सुलिन, स्वादुपिंडाने बनवलेला हार्मोन, ऊर्जेसाठी वापरल्या जाणार्‍या पेशींमध्ये अन्नातून ग्लुकोजचे विघटन करण्यास मदत करते. काहीवेळा शरीर पुरेसे इन्सुलिन तयार करत नाही किंवा इन्सुलिनचा योग्य वापर करू शकत नाही. मग ग्लुकोज रक्तात राहून पेशींपर्यंत पोहोचत नाही आणि रक्तातील ग्लुकोज वाढते.

Diabetes Symptoms
Foods To Control Diabetes: मधुमेहींनो आता शुगर कंट्रोल करणं झाले सोपे ! सकाळी उठल्यावर करा या 6 पदार्थांचे सेवन

अधिकाधिक वारंवार लघवी केल्याने निर्जलीकरण होऊ शकते, ज्यावर उपचार न केल्यास मूत्रपिंडाच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. मधुमेहामध्ये रक्तातील साखरेची (Sugar) पातळी सामान्यपेक्षा जास्त असते त्यामुळे मूत्रपिंड सर्व साखर पुन्हा शोषून घेऊ शकत नाही आणि रक्तातील अतिरिक्त ग्लुकोज लघवीत जाते आणि तेथून अधिक पाणी काढते. याचा अर्थ शरीरात मोठ्या प्रमाणात लघवी निर्माण होऊ लागते.

तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की जर ग्लुकोजची पातळी खूप जास्त असेल तर शरीर मूत्रपिंडांद्वारे रक्तापासून वेगळे करण्याचा प्रयत्न करते आणि अधिक पाणी फिल्टर केले जाते. लोकांना काही कारणाशिवाय अनेक दिवस लघवी जास्त होत असल्यास डॉक्टरांना भेटण्याचा सल्ला दिला जातो. डायबिटीज यूकेनुसार, मधुमेहाच्या इतर लक्षणांमध्ये तहान वाढणे, थकवा जाणवणे आणि वजन कमी होणे यांचा समावेश होतो. 

Diabetes Symptoms
Diabetes Control In Summer Season : उन्हाळ्यात शुगर लेव्हल खरेच वाढते का? जाणून घ्या डॉक्टरांकडून, लगेच होईल कंट्रोल

साखर कमी करण्याचा सोपा मार्ग -

अभ्यासात असे आढळून आले की जेवल्यानंतर दोन ते पाच मिनिटे हलके चालणे रक्तातील साखरेची पातळी बर्‍याच प्रमाणात नियंत्रित करते. अभ्यासात सहभागी झालेल्या लोकांना दोन गटांमध्ये विभागण्यात आले होते - एक गट जे जेवणानंतर बसले आणि दुसरा गट जे जेवणानंतर चालले. जेवल्यानंतर दोन ते पाच मिनिटे चालणाऱ्या गटातील रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झालेले दिसून आले.

यासोबतच संशोधनात असेही आढळून आले की, जे सहभागी प्रत्येक अर्ध्या तासाच्या अंतराने दोन ते पाच मिनिटे चालतात, त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. संशोधकांना असे आढळले की बसून किंवा उभे राहण्याच्या तुलनेत, जेवणानंतर चालणे यामुळे रक्तातील साखर कमी होते. 

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com