Survey
Survey Saam Tv

Survey : मुले सतत ऑनलाईन गेम्स खेळताय? पालकांनी अशाप्रकारे घ्यावी काळजी

सोशल मीडिया आणि स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होत आहे.

Survey : सोशल मीडिया आणि स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होत आहे. मुलांमध्ये तणाव आणि चिंता दिसून येत आहे.

इंटरनेटमध्ये ज्या पद्धतीने झपाट्याने बदल होताना दिसत आहेत, त्याची क्रेझ मुलांमध्येही वाढत आहे. इंटरनेटमुळे मुलं ऑनलाइन गेमिंगकडे अधिक रस दाखवत आहेत. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात सुमारे ४० टक्के पालकांनी आपल्या मुलांना सोशल मीडियाचे व्यसन आहे, ऑनलाइन गेमखेळतात, व्हिडिओ पाहतात, असे मान्य केले आहे. या मुलांचे वय ९ ते १७ वर्षांच्या दरम्यान आहे. हे सर्वेक्षण कम्युनिटी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लोकल सर्कल्सने केले आहे.

Survey
Gyanvapi mosque survey : 'ज्ञानवापी' प्रकरणी कोर्टाचे ३ मोठे आणि महत्वाचे निर्णय

सर्वेक्षणाचे धक्कादायक निष्कर्ष -

सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ४९ टक्के पालकांनी सांगितले की, त्यांची ९ ते १३ वयोगटातील मुले दररोज ३ तासांपेक्षा जास्त वेळ इंटरनेटवर घालवतात.

त्याचबरोबर आपल्या मुलांना सोशल मीडिया, व्हिडिओ आणि ऑनलाइन गेमिंगचं प्रचंड व्यसन असल्याचं ४७ टक्के पालकांनी सांगितलं. याशिवाय १३ ते १७ वर्षांची मुले दररोज ३ तासांपेक्षा जास्त वेळ स्मार्टफोनवर घालवतात, असे ६२ टक्के पालकांचे मत होते.

Survey
Economic Survey 2022 : यंदा Agriculture ची 3.9 टक्क्यांनी Growth अपेक्षित; पाहा व्हिडीओ

कोरोनाची ऑनलाइन क्रेझ वाढली -

सर्वेक्षणात सुमारे ५५ टक्के पालकांनी सांगितले की, त्यांच्या ९ ते १३ वर्षांच्या मुलांना दिवसभर स्मार्टफोनची सुविधा असते. त्याचबरोबर ७१ टक्के लोकांनी सांगितलं की, त्यांची १३ ते १७ वयोगटातील मुलं दिवसभर फोन ठेवतात.

ऑनलाइन क्लासमुळे कोरोना काळात मुलांमध्ये स्मार्ट गॅजेट्सचे व्यसन वाढल्याचे या सर्व पालकांनी मान्य केले.

तणाव आणि चिंतेचा धोका वाढतो -

सोशल मीडिया आणि स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे मुलांच्यामानसिक आरोग्यावरहीपरिणाम होत आहे. मुलांमध्ये तणाव आणि चिंता दिसून येत आहे. तसेच आत्मविश्वास, फोकस आणि चांगली झोप यांचा अभाव आहे. यामुळे किशोरवयीन मुलांच्या वर्तनात झपाट्याने बदल होत आहेत, हे लक्षात घेण्यासारखे आहे.

अमेरिकन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सच्या मते, चांगल्या झोपेसाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणे दररोज २ तासांपेक्षा कमी काळ वापरली पाहिजेत. भारतातील २८७ जिल्ह्यांतील ६५ हजार पालकांवर हे सर्वेक्षण करण्यात आले. यातील ६७% पुरुष आणि ३३% स्त्रिया होत्या.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By : Shraddha Thik

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com