
Poisonous Fungus Cancer Treatment: एकेकाळी शेतातील पिकांसाठी मारक ठरणारी विषारी बुरशी आता मानवाला नवीन जीवनदान देणारी ठरणार आहे. एस्परगिलस फ्लेव्हसला (Aspergillus Flavus) विष मानले जातं. पण आता ही बुरशी कॅन्सरच्या उपचारात प्रभावी ठरणार आहे. अमेरिकन शास्त्रज्ञांनी या बुरशीतून एक विशेष घटक काढलाय. त्यानंतर या बुरशीपासून एक औषध बनवण्यात आले आहे. जे कॅन्सरच्या उपचारासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे ही बुरशी विज्ञानाच्या जगात चमत्कारापेक्षा कमी नाहीये.(Toxic Aspergillus Flavus Fungus Into Cancer-Fighting Drug)
एस्परगिलस फ्लेव्हस ही अशी बुरशी आहे, जी पिकांवर आढळून येते. या बुरशीत अफ्लाटॉक्सिन नावाचं विष तयार होतं. हे विष मानवाचे यकृत आणि इतर अवयवांना गंभीर परिणाम करते. परंतु अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी यातील एक असं रासायनिक तत्व शोधून काढलंय ज्या कॅन्सर्या पेशी नष्ट करण्याची क्षमता ठेवतात.
शास्त्रज्ञांनी या बुरशीपासून एक नैसर्गिक संयुग वेगळे केलंय. जे ट्यूमर पेशींचे डीएनए बदलून नष्ट करते. ही प्रक्रिया शरीरातील सामान्य पेशींवर परिणाम करत नाही. हे औषध सध्या प्री-क्लिनिकल ट्रायलच्या टप्प्यात असून या औषधाचे सुरुवातीचे निकाल खूप आशादायक आहेत. दरम्यान आतापर्यंत, केमोथेरपी, रेडिएशन आणि शस्त्रक्रिया या कर्करोगाच्या उपचारांच्या मुख्य पद्धती होत्या. परंतु या सर्वांचा शरीरावर खोलवर परिणाम होतो.
जर हे नवीन औषध यशस्वी झाले तर ते कर्करोगाचा उपचार कमी वेदनादायक आणि अधिक प्रभावी बनवू शकते.या औषधाच्या क्लिनिकल चाचण्या पुढील दोन ते तीन वर्षांत सुरू होऊ शकतात. जर हे औषध मानवी शरीरावर प्रयोगशाळेतील संशोधनात दाखवल्याप्रमाणे प्रभावी ठरले तर कर्करोगाच्या रुग्णांसाठी हा एक क्रांतिकारी बदल ठरेल,असं शास्त्रज्ञांनी म्हटलंय. एकेकाळी प्राणघातक मानली जाणारी बुरशी आता जीवनरक्षक औषध म्हणून उदयास आलीय. हे संशोधन वैद्यकीय क्षेत्रातील एक मोठे पाऊल आहे, परंतु निसर्गातील प्रत्येक घटकाचे दोन चेहरे असतात हे देखील सिद्ध झालंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.