Gaming: लोकप्रिय फ्री-टू-प्ले फर्स्ट-पर्सन शूटर गेम व्हॅलोरण्टने मुंबईत वाढत्या गेमर्ससाठी गेमिंग अनुभव वाढण्याकरीता नवीन मोड टीम डेथमॅच लाँच केले आहे. नवीन मोड खेळाडूंना धमाल व सर्वसमावेशक पद्धतीने व्हॅलोरण्ट गेम्सचा अनुभव घेण्याची संधी देतो. (Latest Marathi News)
व्हॅलोरण्ट हा रियोट गेम्सचा आघाडीचा पीसी टॅक्टिकल शूटिंग गेम आहे. या गेममध्ये प्रत्येक टीममध्ये ५ खेळाडू असलेल्या दोन टीम्सचा समावेश असतो. प्रत्येक खेळाडू साइन इन करून जगात कुठूनही दुरून गेम खेळू शकतो. गेमच्या सुरूवातीला खेळाडूंना विविध इन-गेम एजंट्समधून निवडण्याचा पर्याय मिळतो. या प्रत्येक एजंटची जगभरातील विविध देश व संस्कृतींमधील स्वत:ची अद्वितीय पार्श्वगाथा आहे. २०२२ मध्ये व्हॅलोरण्टने भारताच्या किनारपट्टीवरील पात्र एजंट हार्बर रीलीज केले. हार्बरच्या लाँचनंतर मुंबईत भव्य साजरीकरण समारोह आयोजित करण्यात आला. भारतातील, तसेच जगभरातील गेमिंग समुदायाकडून हार्बर एजंटला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
भारतीय गेमिंग समुदायाची आवड व उत्साह आमच्यासाठी मोठा प्रेरणास्रोत आहे. आम्ही स्थानिक गेमर्सना टीम डेथमॅच सारख्या उत्साहवर्धक मोड्सचा आनंद देण्याकरिता प्रांतामध्ये प्रबळ रियोट टीम निर्माण करण्यासाठी अथक मेहनत घेत आहोत.
आम्ही खेळाडूंना सर्वोत्तम अनुभव देण्याप्रती कटिबद्ध आहोत, तसेच आम्ही भारतात व दक्षिण आशियामध्ये गुंतवणूक करत राहण्यास उत्सुक आहोत, असे रियोट गेम्सचे भारतातील व दक्षिण आशियामधील कंट्री मॅनेजर अरूण राजप्पा म्हणाले. आम्हाला विश्वास आहे की, टीम डेथमॅचचे अधिक गतीशील स्वरूप अनुभवी व कुशल अशा सर्व स्तराच्या गेमर्सचे लक्ष वेधून घेईल.
या गेम मोडसह आमचा मुलभूत व्हॅलोरण्ट अनुभवाचे सुलभ, उपलब्धहोण्याजोगे व्हर्जन प्रदान करण्याचा उद्देश आहे, जे मुंबईतील नवीन व अनुभवी खेळाडूंसाठी लाभदायी व आनंददायी असेल. आम्ही व्हॅलोरण्ट समुदाय कशाप्रकारे विकसित होईल हे पाहण्यासाठी उत्सुक आहोत. आम्ही त्यांच्या विकासाला पाठिंबा व चालना देण्यासाठी आमच्यापरीने सर्वोत्तम कामगिरी करत राहू, असे रियोट गेम्सचे भारतातील व दक्षिण आशियामधील विपणन प्रमुख आशिष गुप्ता म्हणाले.
भारतातील गेमिंग क्षेत्रात प्रवेश करत नवीन मोड टीम डेथमॅचने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. लोकप्रिय भारतीय गेमिग प्रभावक जसे हायड्राफ्लिक (३२७ हजार सबस्क्रायबर्स), युफोरिया (१०३ हजार सबस्क्रायबर्स) आणि एसके रोसी (१५१ हजार सबस्क्रायबर्स) यांनी यूट्यूबवर त्यांच्या प्रेक्षकांसाठी नवीन मोडमधील गेमप्लेचे स्ट्रिमिंग केले आहे. व्हॅलोरण्ट गेम खेळण्यासाठी https://playvalorant.com/ या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.