Benefits Of Alum : अनेक दुखण्यावर फायदेशीर ठरेल तुरटी !

तुरटीची ओळख आपल्याला लहानपणी शाळेच्या पुस्तकातून झालेली आहे.
Benefits Of Alum
Benefits Of Alum Saam Tv
Published On

Benefits Of Alum : तुरटीची ओळख आपल्याला लहानपणी शाळेच्या पुस्तकातून झालेली आहे किंवा आपल्या घरातील पुरुष मंडळींना बऱ्याचदा दाढी केल्यानंतर अँटी सेपटीक म्हणून तिला गालावरून फिरविताना पाहिलेले असते.

तर कधी पावसाळ्यात गढूळ झालेले पाणी शुद्ध करण्यासाठी तुरटी त्या पाण्यात फिरविली जाते. इतकीच आपल्याला तुरटी विषयी माहिती असते. पण वरवर लहान दिसणारी ही चीज पार डोक्यापासून ते पायाच्या नखापर्यंत प्रत्येक बाबतीत उपयोगी आहे हे तुम्हाला माहित आहे का?

Benefits Of Alum
Dates Health Benefits : हिवाळ्यात अनेक आजारांवर फायदेशीर ठरेल खजूर !

तर पाहूया तुरटीचे ६ महत्त्वाचे फायदे -

१. केसांच्या समस्येवर उपयुक्त -

आजकाल तरुण वयातच पांढऱ्या केसांच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. अशावेळी तुरटीची बारीक पूड करून, तुम्ही केसांना लावत असलेल्या तेलामध्ये ते थोडेसे कोमट करून, त्यात मिसळावी. अर्धा तासांनी ही पूड त्या तेलामध्ये चांगलीच विरघळलेली दिसेल.

मग या तेलाने डोक्याला मसाज करावा. नंतर नेहमीप्रमाणे केस धुऊन टाकावे. महिन्यातून २-३ वेळा हा उपचार केल्यास हळूहळू पांढऱ्या केसांची समस्या कमी झालेली दिसेल. तसेच बऱ्याचदा शाळेत जाणाऱ्या मुलींमध्ये डोक्यात उवा निर्माण होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. अशावेळी हे तुरटी मिश्रित तेल लावल्याने उवांचा नायनाट होतो आणि सतत डोक्याला खाज निर्माण होण्याच्या समस्येपासून सुटकारा मिळतो.

२. तोंड व दातांवरील समस्येवर रामबाण औषध -

एक ग्लास गरम पाण्यात चिमूटभर मीठ व एक लहानसा चमचा तुरटी पावडर घालून मिक्स करावे. हे पाणी गार झाल्यावर या पाण्याने गुळण्या केल्यास दातावरील किड कमी होते. शिवाय तोंडाला एक प्रकारची दुर्गंधी येत असल्यास ती हळूहळू नाहीशी होऊन तोंडाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

३. ताप, खोकला व दमा सारख्या रोगांवर -

वातावरणातील बदलामुळे ताप, खोकला, दमा यासारख्या समस्या डोके वर काढू लागल्या आहेत. या समस्यांच्या सुरुवातीच्या काळातच रात्री झोपताना एक ग्लास दुधामध्ये १० ग्रॅम खडी साखर व 2 चिमूट तुरटीची पूड एकत्र करून घ्यावी. यामुळे चांगलाच आराम पडतो.

Benefits Of Alum
Bone Health Tips : हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल 'या' पिठाची भाकरी, जाणून घ्या

४. आखडलेल्या मांसपेशीवर उपयुक्त -

बऱ्याच जणांना मांसपेशी आखडण्याची समस्या भेडसावीत असते. अशावेळी तुरटी आणि हळदीची पूड एकत्र करून आखडलेल्या मांसपेशीवर लावल्यास आराम मिळतो.

५. चेहऱ्यावरील त्वचा उजळविण्यासाठी -

तुरटीची पूड करून त्यात थोडे गुलाबजल टाकून, त्याची दाटसर पेस्ट तयार करावी. ही पेस्ट चेहरा धुवून त्यावर लावावी. 11-15 मिनिटे ठेवून मग चेहरा साध्या पाण्याने धुवून टाकावा. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यास तुमची त्वचा उजळलेली दिसेल. शिवाय चेहऱ्यावर वांग किंवा डागाची समस्या असल्यास ते देखील या वापराने दूर होतात

६. नितळ पायांसाठी -

बऱ्याच जणांचे पाय काळवंडलेले आणि त्यावरील त्वचा फाटलेली असते. अशावेळी कोमट पाण्यात तुरटी फिरवून त्या पाण्यात 15 ते 20 मिनिटे पाय बुडवून ठेवल्यास पायांच्या त्वचेमध्ये चांगलाच फरक झालेला दिसून येतो.

आता इतके सारे वाचल्यानंतर या स्वस्त अशा तुरटीचे किती फायदे आहेत, हे तुमच्या लक्षात आलेच असेल. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की, तुरटीचा वापर हा माफक प्रमाणात असावा. रोजच्या रोज तुरटीचा वापर केल्यास तो आरोग्याच्या दृष्टीने नुकसानदायी ठरते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com