Air Pollution : प्रदूषणामुळे वाढतोय तणाव, स्वभाव होतोय चिडचिडा अन् रागीट; अभ्यासातून धक्कादायक खुलासा

Air Pollution Effects In Mental Health : रोजचे बदलते हवामान, प्रदूषण, वाहनांचे धूर, हवेतील धूळ यांमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. प्रदूषणाचा धोका दिवसेंदिवस वाढतच आहे.
Air Pollution
Air PollutionSaam Tv
Published On

Air Pollution Side Effects :

बदलते हवामान आणि हिवाळा याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होताना दिसून येत आहे. अशातच देशभरात सध्या प्रदूषणाचा धोका प्रचंड वाढत आहे. रोजचे बदलते हवामान, प्रदूषण, वाहनांचे धूर, हवेतील धूळ यांमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. प्रदूषणाचा धोका दिवसेंदिवस वाढतच आहे. देशात अहमदाबाद, दिल्ली, मुंबईसह सर्वत्र प्रदूषणाने लोकांचे जगणं मुश्किल केलं आहे.

अहमदाबादमध्ये प्रदूषणाचा (Pollution) धोका वाढत आहे. त्यामुळे डॉक्टरांकडे येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. यामध्ये प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांचे (Disease) प्रमाण जास्त आहे. याबाबत डॉ. गोपाळ राव यांनी सांगितले की, आमच्याकडे आलेल्या रुग्णांमध्ये प्रदूषणामुळे त्रास होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे.

बांधकाम व्यवसाय आणि त्यामुळे होणारे प्रदूषण यामुळे सर्वांना खूप त्रास होते. तसेच वाहतूक कोंडी, पेट्रोल डिझेलमुळे होणारे प्रदूषण याचेही प्रमाण वाढत आहे. त्यामुळे लोकांच्या शरीरासोबत मानसिक आजारदेखील (Mental Health) होतात. यामुळे लोकांचा स्वभाव चिडचिडा, रागीट होतो. तसेच यामुळे कोरडा खोकला आणि इनफेक्शन होते.

Air Pollution
थांबा! तुम्हालाही Red Wine आरोग्यासाठी फायदेशीर वाटते? संशोधन काय सांगते जाणून घ्या

अहमदाबादसोबतच संपूर्ण देश प्रदूषणामुळे त्रस्त आहे. एका केस स्टडीनुसार, देशातील ६० टक्के प्रदूषण हे ५ राज्यात आहे. उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र , राजस्थान या राज्यात प्रदूषणाचे सर्वात जास्त प्रमाण आहे. त्यासोबतच हे प्रदूषण होण्याचे मुख्य कारण म्हणजे वाहने.

वाहनांमुळे हवेतील प्रदूषण वाढते. त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या होत असल्याचे निदर्शनास आले आहे. २०२२ मध्ये जास्त प्रमाणात वाहन खरेदी झाली असून त्यामुळे होणारे प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन सरकार करत असते.

Air Pollution
Diabetes रुग्णांनो 2024 च्या सुरुवातीला लाइफस्टाइलमध्ये करा हे बदल, राहाल फिट

घराबाहेर पडताना नेहमी मास्क लावा. धुळीपासून वाचण्यासाठी स्कार्फ बांधा. घरी गेल्यावर लगेचच तोंड धुवा. रस्त्यावरुन जाताना काळजी घ्या. सर्दी खोकला झाल्यावर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com