AC Disadvantages : २४ तास AC मध्ये असता? वाचा आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

Air Conditioner Side Effects : सतत एसीच्या हवेत बसल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो? याची माहिती आज जाणून घेणार आहोत.
Air Conditioner Side Effects
AC DisadvantagesSaam TV
Published On

सध्या ऑक्टोबर हिट सुरू झाली आहे. विविध शहरांत आणि गावांमध्ये देखील सर्वत्र उष्णता पसरली आहे. उन्हामुळे व्यक्ती हैराण आहेत. सतत घाम येत असल्याने बहुतेक व्यक्ती फक्त एसीमध्ये राहणे पसंत करतात. एसीमध्ये शरीर थंड राहते. स्किनवर घाम येत नाही, शिवाय आपल्याला नेहमी फ्रेश वाटते. मात्र तुम्हाला माहिती आहे का? एसीचे जितके फायदे आहेत तितकेच तोटे आणि नुकसान देखील आहे.

Air Conditioner Side Effects
Flipkart Super Cooling Days Sale: उन्हाळ्यात एसी घ्यायचा विचार करताय? फ्लिपकार्टच्या सेलमध्ये मिळतेय जबरदस्त ऑफर

आपण ऑफिसमध्ये असताना तेथे देखील २२ ते २३ तापमानावर एसी असतो. त्यात घरी गेल्यावर वाहनातून प्रवास करताना आता एसी कार, एसी ट्रेन आल्या आहेत. तसेच घरी देखील एसी असतो. त्यामुळे व्यक्ती दिवसभर एसीमध्ये असतो. आता सतत एसीमध्ये असल्याने आपल्या आरोग्यावर त्याचा बराचसा गंभीर परिणाम होतो त्यामुळे आज आम्ही तुम्हाला एसीच्या दुष्परिणामांची माहिती सांगणार आहोत.

डिहायड्रेशन

जास्त वेळ एसीमध्ये असल्याने आपण पाणी पित नाही. शरीराला थंडी वाजत असते त्यामुळे आपल्याला तहान लागत नाही. तसेच तहान लागली तरी पाणी प्यावेसे वाटत नाही. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते आणि शरीर डिहायड्रेट होतं. याने पुढे डोकेदुखी आणि मायग्रेन सुद्धा होतं.

ड्राय स्किन

सतत एसीची हवा त्वचेवर आल्याने त्वचेत असलेला ओलावा आणि मॉश्चरायजर कमी होतं. यामुळे त्वचा ड्राय होते आणि सुरकूत्या येतात. तसेच याने स्किनवर जळजळ होते आणि खाज येण्यास सुरुवात होते.

लठ्ठपणा

ज्या व्यक्ती संपूर्ण दिवसभर एसीमध्ये राहतात त्यांना लठ्ठपणा जाणवतो. एसीमुळे शरीरातील ऊर्जा कमी होते. शरीरात हालचाल व्हावी आणि चपळपणा असावा यासाठी शरीरात ऊर्जा असणे सुद्धा महत्वाचे असते. मात्र एसीमुळे शरीरात अजिबात ऊर्जा राहत नाही आणि व्यक्ती लठ्ठ होतात.

हाडांमध्ये वेदना

सतत एसीच्या हवेमध्ये राहिल्याने त्याचा थेट परिणाम आपल्या हाडांवर होतो. हाडे ठिसूळ आणि कमजोर होतात. तसेच हाडांमध्ये वेदना जाणवू लागतात. इ कंफर्ट अकॅडमीच्या एका रिसर्चमधून याबाबत माहिती समोर आली आहे. यामध्ये सध्या हाडांच्या समस्येने त्रस्त असलेल्या व्यक्ती एसीमुळे आजारी पडल्याचे प्रमाण जास्त आहे.

Air Conditioner Side Effects
Mumbai Air Pollution : मुंबईची हवा पुन्हा बिघडली, 24 तासांत PM2.5 पातळी 50% पेक्षा वाढली,नक्की काय आहे कारण?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com