डायबेटीसच्या रुग्णांसाठी एक खूशखबर. कारण डायबेटीस मुक्तीची संजीवनी सापडलीय आणि तीही आपल्या देशात...केवळ दोन तासात एका ऑपरेशनने शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात येईल.. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. दिल्लीच्या ऑल इंडीया इन्स्टिट्यूट ऑफ मेडीकल सायन्समधील डॉक्टरांनी हा दावा केला आहे.
आत्तापर्यं 35 रुग्णांवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. हे सर्व रुग्ण डायबेटीसमुक्त झाल्याचा दावा डॉ. मंजुनाथ यांनी केलाय.
डायबेटीस मुक्तीची संजीवनी
ही शस्त्रक्रिया स्वादुपिंडावर नाही तर पोट आणि लहान आतड्यावर केली जाते
जठरात काही हार्मोन्सचे उत्पादन रोखले जाते
संपूर्ण शस्त्रक्रिया फक्त दोन तासांत पूर्ण होते
रुग्ण 24 तासांत घरी परतू शकतात
डॉक्टरांच्या मते, ही शस्त्रक्रिया मूळतः लठ्ठपणावर उपचार करण्यासाठी होती. मात्र आता ती मधुमेहावर उपचार करण्यासाठी देखील वापरली जाऊ शकते. मात्र एम्सने स्पष्ट केले आहे की ही विशिष्ट शस्त्रक्रिया प्रत्येक रुग्णाला फायदेशीर ठरेलच असं नाही
शस्त्रक्रिया कुणी करावी ?
ज्यांना दीर्घकाळापासून डायबेटीस
HBA1C सतत 7.5 पेक्षा जास्त
औषधानंतरही डायबेटीस अनियंत्रित
ज्यांना 15 वर्षांपेक्षा जास्त काळ मधुमेह आहे आणि ज्यांना 100 युनिट्सपर्यंत इन्सुलिनची आवश्यकता असते, त्यांच्यासाठी मात्र हे ऑपरेशन नाही. 'द लॅन्सेट'च्या ताज्या अहवालात देशातील मधुमेहाचं वाढतं प्रमाण बघता ही भारतीयांसाठी धोक्याची घंटा आहे.
भारत मधुमेहाची राजधानी ?
पुरुष, महिला दोघांमध्येही मधुमेहाचा धोका समान वेगाने वाढत आहे
देशात 10 कोटी नागरीकांना डायबेटीस
भविष्यात 15 कोटी रुग्ण असण्याचा इशारा
2050 पर्यंत रुग्णांची संख्या 73 % ने वाढण्याचा अंदाज
भारतात मधुमेह असलेल्या प्रौढांची संख्या जगात दुसऱ्या क्रमांकावर
शस्त्रक्रियेनंतर तुम्ही निरोगी आहार घेतल्यास तुम्हाला मधुमेह होणार नाही. तथापि, जर तुमचा आहार योग्य नसेल तर मधुमेह पुन्हा होऊ शकतो. म्हणूनच, शस्त्रक्रियेनंतर रुग्णाने निरोगी आहार घेणे आणि यासोबतच चांगली जीवनशैली देखील आवश्यक आहे. तरच तुमच्या आयुष्यातली गोडी टिकून राहिल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.