सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; अमूल पाठोपाठ आता 'या' दुधाचे दर वाढले

गायीच्या दुधाच्या दरात लिटरमागे २ रुपयांनी वाढ
Milk
MilkSaam Tv
Published On

नवी दिल्ली - सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे कारण अमूलनंतर (Amul) आता पराग दुधाचे (Milk) दर देखील वाढले आहे. डेअरी फर्म पराग मिल्क फूड्स लिमिटेडने आजपासून लागू झालेल्या गोवर्धन ब्रँडच्या गायीच्या दुधाच्या (Cow Milk) दरात लिटरमागे २ रुपयांनी वाढ केली आहे.

गोवर्धन गोल्ड मिल्कचा दर आता ४८ रुपयांवरून ५० रुपये झाला आहे. तर टोन्ड दुधाचे भाव ४६ रुपयांवरून ४८ रुपयांवर पोहोचला आहे. याबाबद पराग मिल्क फूड्स लिमिटेडने सांगितले की, वाढत्या किंमतीमुळे दरात ५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आजपासून हे नवे दर लागू करण्यात आले आहे.

हे देखील पहा -

याबाबद पराग मिल्क फूड्सचे अध्यक्ष देवेंद्र शहा म्हणाले की, वीज, पॅकेजिंग, लॉजिस्टिक आणि पशुखाद्य यांच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्यामुळे कंपनीने तीन वर्षांनंतर दुधाच्या किंमतीती वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचा खर्चही वाढला असून त्यांना आता दुधासाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळेच कंपनीला सर्व गोष्टी लक्षात घेऊन घेऊन किंमतीवाढवाव्या लागल्या.

Milk
नवाब मलिक हे दाऊदचे फ्रंट मॅन; निलेश राणेंचा गंभीर आरोप

अमूलचे दूधही दोन रुपयांनी महागले

गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने 1 मार्चपासून देशभरातील अमूल ब्रँडच्या दुधाच्या किमतीत वाढ केली आहे. कंपनीने सर्व प्रकारांच्या दुधावर लिटरमागे दोन रुपयांनी वाढ केली आहे. अमूलचे गोल्ड मिल्क आता ५८ ऐवजी ६० रुपये लिटर झाले आहे. तसेच अमूल टोन्ड मिल्क ४६ ऐवजी ४८ रुपये प्रति लिटर आणि अमूल शक्ती ५२ ऐवजी ५४ रुपये प्रति लिटर झाले आहे.

अमूल 80 टक्के कमाई शेतकऱ्यांना देते

GCMMFचे म्हणणे आहे की प्रति लिटर 2 रुपयांनी किंमत वाढवल्यानंतर एकूण किरकोळ किंमत 4 टक्क्यांनी वाढेल जी अन्न महागाई दरापेक्षा कमी आहे. कंपनीने दावा केला आहे की पॉलिसी अंतर्गत, दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थांपासून 80 टक्के कमाई शेतकऱ्यांना दिली जाते. भाव वाढल्याने महागाईने होरपळलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळण्यास मदत होईल.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com