
Solar storm 2022: आज 14 एप्रिल रोजी पृथ्वीवर मोठे सौर वादळ येण्याची शक्यता आहे. या सौर वादळाच्या (News About Geomagnetic Storms Earth) पृथ्वीवर होणाऱ्या प्रभावामुळे त्याचे घातक परिणाम दिसून येतील, अशी भीती शास्त्रज्ञांना आहे. (Solar Storm 2022) कोरोनल मास इजेक्शनमुळे (Coronal Mass Ejection) हे सौर वादळ निर्माण झाल्याचा अंदाज नासाने (NASA) वर्तवला आहे. यूएस स्पेस वेदर सेंटरने (SWPC) या सौर वादळाचे वर्णन G-2 श्रेणीमध्ये केले आहे, जे अतिशय धोकादायक मानले जाते. सर्वात शक्तिशाली सौर वादळ "G5 एक्स्ट्रीम" म्हणून वर्गीकृत आहे आणि सर्वात कमकुवत सौर वादळ "G1 मायनर" म्हणून वर्गीकृत आहे. सेंटर ऑफ एक्सलन्स इन स्पेस सायन्सेस इंडिया (CESSI) ने ट्विट केले की 14 एप्रिल 2022 रोजी हे सौर वादळ 429 ते 575 किलोमीटर प्रति सेकंद या वेगाने पृथ्वीवर धडकेल. (A big solar storm will hit the earth; Scientists are worried)
हे देखील पहा -
सौर वादळ कधी धडकेल हे जाणून घ्या
अंतराळ हवामानशास्त्रज्ञ तमिता स्कोव्ह यांनी ट्विट केले की, सौर वादळ 14 एप्रिल रोजी थेट पृथ्वीवर धडकेल. त्यानंतर ते अधिक धोकादायक होईल. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६ वाजता हे सौर वादळ धडकू शकते, असे नासाने सांगितले आहे. पृथ्वीशी टक्कर दिल्यानंतर मागून येणाऱ्या दाबामुळे हे वादळ आणखी तीव्र होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पृथ्वीवर सौर वादळे का येतात?
सौर क्रियाकलापांच्या चार मुख्य घटकांमध्ये सौर ज्वाला, कोरोनल मास इजेक्शन, उच्च-गती सौर वारा आणि सौर ऊर्जा कण यांचा समावेश होतो. त्यामुळे पृथ्वीवर सौर वादळे येत असतात. नासाच्या म्हणण्यानुसार, जेव्हा आपली पृथ्वी सूर्याच्या बाजूला असते तेव्हाच सौर ज्वाला पृथ्वीवर परिणाम करतात. त्याचप्रमाणे, कोरोनल मास इजेक्शनमध्ये, प्लाझ्मा आणि चुंबकीय क्षेत्राचे प्रचंड ढग सूर्यातून बाहेर पडतात, जर त्यांची दिशा आपल्या पृथ्वीकडे असेल तरच पृथ्वीवर परिणाम होईल.
उपग्रहांचेही नुकसान होऊ शकते
सौर वादळ पृथ्वीवर आदळल्यामुळे सर्वात जास्त परिणाम बाह्य वातावरणात दिसून येतो. याचा थेट परिणाम पृथ्वीभोवती फिरणाऱ्या उपग्रहांवर होऊ शकतो. शास्त्रज्ञांच्या मते, जीपीएस नेव्हिगेशन, मोबाइल फोन सिग्नल आणि सॅटेलाइट टीव्ही यांसारख्या सेवांवर परिणाम होऊ शकतो. सर्वात कमकुवत सौर वादळामुळे देखील पॉवर ग्रीडमध्ये चढ-उतार होऊ शकतो.
रेडिओ आणि जीपीएस ब्लॅकआउटचा धोका
शास्त्रज्ञ तमिथा स्कोव्ह यांनी स्पष्ट केले की, रेडिओ ब्लॅकआउटचा धोका कमी आहे, परंतु रेडिओ ऑपरेटर आणि जीपीएस वापरकर्त्यांना रात्रीच्या वेळी अडचणी येऊ शकतात. बहुतेक सौर वादळांमुळे रेडिओ किंवा इलेक्ट्रिकल ब्लॅकआउट होतात. सर्वात शक्तिशाली श्रेणीतील सौर वादळे अधिक धोकादायक असतात.
सौर वादळाचे नेत्रदीपक दृश्य
सौर वादळामुळे रात्री पृथ्वीच्या ध्रुवीय प्रदेशांचे विहंगम दृश्य दिसते. रात्री संपूर्ण आकाश सुंदर निळ्या प्रकाशाने उजळून निघते. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्र वाहिनीतील विद्युतभार असलेले सौर कण जेव्हा ध्रुवाकडे जातात तेव्हा अरोरा दिसून येतो. यामुळे चमकदार हिरव्या रिबनसारखा प्रकाश निर्माण होतो. जेव्हा सौर ज्वाला असे कण मोठ्या संख्येने पृथ्वीच्या वातावरणाकडे पाठवतात तेव्हा हा प्रकाश आकाशात दिसतो.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.