
Infinix Hot 20 5G Launched : भारतात सध्या 5G नेटवर्क लॉंच झाले आहे. रिलायन्सने हल्लीच 5G नेटवर्क लॉंच केले असल्याने भारतात नवनवीन 5G फोन येत आहेत.
भारतात स्वस्त 5 G स्मार्टफोन Infinix Hot 20 5G लॉन्च केला आहे. या फोनमध्ये 120Hz स्क्रीन देण्यात आली आहे. कंपनीचा हा बजेट (Budget) स्मार्टफोन 12 5G बँड सपोर्टसह येतो. त्याचा प्राथमिक कॅमेरा 50-मेगापिक्सलचा आहे. त्याचे इतर तपशील आणि किंमत जाणून घ्या.(Smartphone)
Infinix ने आपला स्वस्त 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने या फोनला Infinix Hot 205G असे नाव दिले आहे. उच्च रिफ्रेश रेट डिस्प्ले व्यतिरिक्त यामध्ये मोठी बॅटरी आणि 12 5G बँड देण्यात आले आहेत. कंपनीच्या या बजेट फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याची किंमत 15 हजार रुपयांपेक्षा कमी ठेवण्यात आली आहे.
Infinix Hot 20 5G किंमत आणि विक्री डिटेल्स Infinix Hot 20 5G कंपनीने 11,999 रुपयांच्या विशेष किमतीत लॉन्च केला आहे. ही किंमत फक्त 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजसाठी आहे. कंपनीने हा फोन ब्लास्टर ग्रीन, रेसिंग ब्लॅक आणि स्पेस ब्लू कलर पर्यायांमध्ये लॉ केला आहे. त्याची विक्री 9 डिसेंबरपासून फ्लिपकार्टवर सुरू होईल.
Infinix Hot 20 5G चे डिटेल्स -
Infinix Hot 20 5G मध्ये 6.6-इंचाची ड्रॉप-नॉच स्क्रीन आहे. यामध्ये फुल-एचडी + रिझोल्यूशन देण्यात आले आहे. या फोनचा LCD पॅनल 120Hz रिफ्रेश रेट आणि 180Hz टच सॅम्पलिंग रेटसह येतो. फोनमध्ये पांडा ग्लास प्रोटेक्शन देण्यात आले आहे.
फोटोग्राफीबद्दल बोलायचे झाले तर फोनच्या मागील बाजूस डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्राथमिक कॅमेरा 50-मेगापिक्सलचा आहे. यासोबत आणखी एक लेन्स देण्यात आली आहे.
मुख्य कॅमेऱ्यासह आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाही सपोर्ट देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी फ्रंटला 8-मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. LED फ्लॅश समोर आणि मागील दोन्ही कॅमेऱ्यांसाठी समर्थित आहे.
MediaTek Dimensity 810 चिपसेट देण्यात आला आहे
Infinix Hot 20 5G मध्ये, 6nm octa-core
MediaTek Dimensity 810 चिपसेट देण्यात आला आहे. कंपनीच्या मते, AnTuTu बेंचमार्किंगवर या चिपसेटचा स्कोअर 396798 पॉइंट होता. फोनमध्ये 4GB रॅमसह 64GB इंटरनल मेमरी आहे.
त्याची अंतर्गत मेमरी मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 1TB पर्यंत वाढवता येते. यामध्ये 3GB चा एक्सटेंडेड रॅम सपोर्टही देण्यात आला आहे. या हँडसेटमध्ये 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे.
यात वायर्ड हेडफोनसाठी 3.5mm जॅक देखील आहे. यात डीटीएस ऑडिओ सपोर्ट असलेले स्पीकर देखील आहेत. सुरक्षेसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेशियल अनलॉक सपोर्ट देण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.