Mumbai Pune Waterfall: मुंबई-पुण्याजवळचे डोळ्याचं पारणं फेडणारे धबधबे; VIDEO पाहून लगेच बॅग भराल

Waterfall Near Mumbai And Pune : यंदाच्या वींकेडला फिरण्याचा प्लान करत असाल तर मुंबई-पुण्यालगत असणारे हे धबधबे नक्कीच तुम्हाला पसंत पडतील.
Mumbai Pune Waterfall
Mumbai Pune WaterfallSaam tv

Maharashtra Waterfall : धो-धो बरसणारा पाऊस, कडक चहा, मस्त अशी भजी आणि निसर्गाचा मनमोहक दृश्य. कुणाला पाहायला नाही आवडणार. पावसाळा सुरु झाला की, अनेक पर्यटक प्रेमींना वेध लागतात ते ट्रेकिंगचे, निसर्ग फिरण्याचे आणि त्यांच्या हिरवळीचे. पावसाळ्यात आपण अनेकदा फिरण्याचे प्लान करतो.

वीकेंड येण्यापूर्वीच आपण यंदा कुठे जायचे याचा प्लान करतो. अनेकदा ट्रेकिंग करताना आपण डोंगराळ भागातून फिरायला जातो. पण जर तुम्ही यंदाच्या वींकेडला फिरण्याचा प्लान करत असाल तर मुंबई-पुण्यालगत असणारे हे धबधबे नक्कीच तुम्हाला पसंत पडतील. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर

Mumbai Pune Waterfall
Belapur Station : जागा एकच पण रेल्वे स्टेशन दोन, नावही त्यांचे वेगळे

1. देवकुंड धबधबा

रायगड (Raigad) जिल्ह्यातील देवकुंड धबधबा तरुणाईला सतत खुणावतो. पुण्यापासून काही तासांच्या अंतरावर असेलला धबधबा तरुणांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. भिरा रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात देवकुंड धबधबा (Devkund Waterfall) आहे. भिरा गावात पोहचल्या नंतर अंदाजे दीड ते दोन तासांच्या ट्रेक नंतर देवकुंड धबधब्यावर पोहचता येते. यासाठी साधारण 7 किलोमीटर चालावे लागते.

2. काळू धबधबा

माळेशज घाटातील काळू धबधबा हा निसर्गरम्य दृश्याने डोळ्यांचे पारणे फेडतो. हा धबधबा उलट्या दिशेने वाहतो. अहमदनगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील करंजाळे गावापासून 4 किमी अंतरावर आहे. हरिश्चंद्रगडाच्या कुशीतून वाहणाऱ्या या धबधब्याची पर्यटकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे.

Mumbai Pune Waterfall
Thane Picnic Spots: पिकनिक स्पॉट शोधताय? ते ही ठाण्यात; ही १० पर्यटनस्थळे आहेत उत्तम पर्याय...

3. नानेमाची धबधबा

महाड तालुक्यातील सुप्रसिध्द धबधबा हा पर्यटकांसाठी अतिशय मनमोहक असा आहे. पुण्यापासून सुमारे ४ तासांच्या अंतरावर नानेमाची धबधबा आहे. ४०० फूट डोंगरावरुन खाली पाहिल्यानंतर मोठी नदी धबधब्याचे रुप घेते. याचे पाणी अगदी पांढरे शुभ्र व फेसाळ आहे. पुण्यापासून (Pune) नानेमाची धबधब्याचे अंतर सुमारे ७० किलोमीटर आहे आणि मुंबईपासून २१० किलोमीटर आहे.

4. अंबोली धबधबा

अंबोली हा धबधबा आपल्या फेसाळणाऱ्या धबधब्यांसाठी ओळखला जातो. या ठिकाणी आपल्याला घनदाट झाडी, धुके व कोसळणारे धबधबे पाहायला मिळतात. तसेच मुंबईपासून १३० किमी तर पुण्यापासून ११५ किमी अंतरावर आहे.

Mumbai Pune Waterfall
One Day Trip In Badlapur: निसर्गाचा मनसोक्त आनंद घ्यायचाय? बदलापूरमधली ही ठिकाणे आहेत मनमोहक!

5. कातळधार धबधबा

लोणावळा येथून राजमाची किल्ल्याकडे जाताना कातळधार धबधबा लागतो. असंख्य पर्यटकांचं हे आकर्षणाचं ठिकाण आहे. कातळ म्हणजे उभा कडा आणि धार म्हणजे धबधबा. साधारण 450 फूट उंच, सरळसोट आणि चढायला अवघड असलेला कातळधार सर करणे हे अनेक ट्रेकर्स स्वप्न असतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com