Best Foods for Diabetes: मधुमेहींनी सकाळी नाश्त्यात खा 'हे' पदार्थ, ब्लड शुगर राहील नियंत्रणात

Healthy Breakfast for Diabetics: डायबिटीजमध्ये ब्लड शुगर लेवल कंट्रोलमध्ये असणं फार महत्वाचं असतं. त्यासाठी सगळ्यात महत्वाचा असतो तो म्हणजे आपला आहार. तुम्ही जितके पौष्टीक अन्न खाता तितके तुम्ही आजारांपासून लांब राहता.
Healthy Breakfast for Diabetics
Best Foods for Diabetesai
Published On

डायबिटीजमध्ये ब्लड शुगर लेवल कंट्रोलमध्ये असणं फार महत्वाचं असतं. त्यासाठी सगळ्यात महत्वाचा असतो तो म्हणजे आपला आहार. तुम्ही जितके पौष्टीक अन्न खाता तितके तुम्ही आजारांपासून लांब राहता. अशातच डायबिटीज हा आजार तुमच्या आहाराशी संबंधीत आहे. तुम्ही रोजच्या आहारात असे काही पदार्थ खाल्ले पाहिजेत जे तुमच्या आहाराशी संबंधीत आहेत. त्याने तुमची ब्लड शुगर लेवल कंट्रोल राहील. मग ते पदार्थ कोणते? हे आपण पुढील माहितीतून जाणून घेणार आहोत.

Healthy Breakfast for Diabetics
Kiwi for Diabetes: डायबिटीज ते डोळ्यांच्या समस्येसाठी 'हे' फळ आहे बहुगुणी

ओट्स

ओट्स हा सगळ्यात हेल्दी ब्रेकफास्ट आहे. जर तुम्हाला डायबिटीज असेल तर हा पदार्थ तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. यात असलेले फायबर तुमची ब्लड शुगर लेवल कंट्रोल करू शकतात. तुम्ही जर ओट्स दुध किंवा दह्यासोबत खाल्ले तर खूप फायद्याचे ठरेल. शिवाय त्यात तुम्ही ताज्या फळांचा समावेश करू शकता. ओट्समध्ये कार्बोहायड्रेट्स असतात. ते हळूहळू पचन होतात. याने तुम्हाला वजन कमी करण्यासाठी सुद्धा फायदा होईल.

अंडी

अंडी तुम्हाला सगळ्यात जास्त प्रोटीन मिळवून देतात. अंडी सेवन केल्याने तुम्हाला कार्बोहायइड्रेट्स मिळू शकतात. तसेच तुमची ब्लड शुगर लेवल कंट्रोल राहण्यास मदत होते. तसेच अंडी खाल्याने तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहते आणि इतर अनहेल्दी पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही. तुम्ही उकडलेली अंडी, ऑमलेट किंवा पोच्ड ऐग तुम्ही खाऊ शकता.

दही

दही हे उत्तम प्रोटीन आणि प्रोबायोटिक्स मिळवण्यासाठीचा पदार्थ आहे. दही सेवन केल्याने पोटासंबंधीत सगळ्या समस्या दूर होण्यास मदत होते. डायबिटीजच्या रुग्णांनी लो- फॅट किंवा ग्रीक योगर्ट उत्तम पर्याय आहे. तुम्ही दह्यासोबत नट्सचे सुद्धा सेवन करू शकता. त्याने तुमचा एक पौष्टीक नाश्ता तयार होईल. तसेत तुमचे ब्लड शुगर लेवल स्थिर राहण्यासाठी तुम्ही दह्याचा वापर करू शकता.

हिरव्या पालेभाज्या

पालक, मेथी, ब्रोकली तसेच फायबर, व्हिटॅमिन आणि मिनरल्स ही सगळी पोषक तत्वे तुम्हाला हिरव्या पालेभाज्यांमधून दिसू शकतात. तुम्ही ऑमलेटमध्ये या भाज्या मिक्स करून खाऊ शकता. याने तुमची ब्लड शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहू शकते. तसेच शरीर निरोगी राहण्यास मदत होऊ शकते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Healthy Breakfast for Diabetics
International Womens Day: महिलांना होणारे सगळ्यात गंभीर आजार कोणते? जाणून घ्या सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com