आजच्या दुनियेत मुलींनी प्रत्येक बाबतीत सक्षम राहणे आणि स्वतः चे संरक्षण करणे खूप महत्त्वाचे आहे.
महिलांनी कोणत्याही प्रसंगात हिंमत न सोडता परिस्थितीला सामोरे जावे. प्रत्येक गोष्टीचा निडरपणे सामना करायचा. कारण घाबरल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते.
समोरच्याला आपण घाबरलो किंवा दचकलो याची चाहूल लागता कामा नये. त्यामुळे आपल्या देहबोलीमध्ये प्रचंड आत्मविश्वास ठेवा. जेणेकरून समोरचा माणूस तुम्हाला घाबरेल.
कोणत्याही परिस्थिती महिलांनी आपल्या चेहऱ्यावर घाबरलेपणाचा भाव दाखवू नये. रात्री किंवा भर दुपारी रस्त्याने एकटे जात असाल तर, कानामध्ये हेडफोन लावा. यामुळे तुम्ही कोणाशी तरी बोलता आहात हे पाहून पाठलाग करणारा व्यक्ती घाबरून तिथून पळून जाईल.
तुम्ही या परिस्थितीत फोनवर बोलत राहिल्यास तुमच्या जवळच्या व्यक्तींना याची माहिती मिळेल आणि ते तुम्हाला सुखरूप त्या वाईट प्रसंगातून बाहेर काढतील.
अचानक कोणी तुमच्यावर मागून हल्ला केला तर, प्रसंगावधान ठेवून आपल्या हाताच्या कोपऱ्याने किंवा लाथेने त्याला मारा. चुकूनही घाबरून जाऊ नका.
प्रत्येक महिलेने आपल्या जवळ पेपर स्प्रे, परफ्यूम ठेवा. जेणेकरून एखादा वाईट प्रसंग आल्यावर तुम्ही स्वतः चा जीव वाचवू शकता.
प्रत्येकाच्या बॅगमध्ये पेन आणि डायरी असते. पेन वापरून देखील महिला स्वतः चे संरक्षण करू शकतात. बॅगेच्या कोपराच्या कप्प्यात नेहमी एक पेन ठेवा. वाईट प्रसंगी पेनाची निब मदत करले. तुम्ही याच्या साहाय्याने मानेवर, हातावर वार करून त्याला जखमी करू शकता.
महिलांनो तुम्ही सुद्धा बाहेर जाताना जास्त सोने-चांदीचे दागिने घालणे टाळा. गर्दीच्या ठिकाणी मोबाईलवर बोलू नका.
तुम्ही टॅक्सी किंवा हॉटेलचे ऑनलाइन बुकिंग केले असाल तर, त्याचा नंबर आणि लाईव्ह लोकेशन तुमच्या कुटुंबाला पाठवून ठेवा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.