Vande Bharat Train: देशामध्ये किती वंदे भारत ट्रेन धावतात, आतापर्यंत किती जणांनी केला प्रवास?

Indian Railway: भारतामध्ये वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यापासून लोकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. देशामध्ये आतापर्यंत किती वंदे भारत ट्रेन धावतात हे जाणून घ्या....
Vande Bharat Train
Vande Bharat TrainSocial Media
Published on
Vande Bharat Train
Vande Bharat TrainSocial Media

सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेन २०१९ मध्ये सुरू झाल्या. आता देशातील बहुतेक राज्यांमध्ये वंदे भारत ट्रेन धावतात.

Vande Bharat Train
Vande Bharat TrainSocial Media

टप्प्या टप्प्याने वेगवेगळ्या राज्यांमध्ये वंदे भारत ट्रेन सुरू केल्या जात आहेत. पीएम मोदी १५ सप्टेंबर रोजी झारखंडमधील जमशेदपूर येथून १० नवीन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील.

Vande Bharat Train
Vande Bharat TrainSocial Media

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, देशात वंदे भारत ट्रेन सुरु झाल्यापासून ते २० ऑगस्टपर्यंत या ट्रेनमधून सुमारे ३.१७ कोटी लोकांनी प्रवास केला आहे.

Vande Bharat Train
Vande Bharat TrainSocial Media

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशात ५४ वंदे भारत ट्रेन धावत असून २० ऑगस्टपर्यंत त्यांनी ३५,४२८ ट्रिपमध्ये ३.१७ कोटी प्रवाशांनी प्रवास केला.

Vande Bharat Train
Vande Bharat TrainSocial Media

फेब्रुवारी २०१९ मध्ये वंदे भारत ट्रेन सुरू झाल्या. वंदे भारत ट्रेनचे जाळे देशातील २८० जिल्हे आणि २४ राज्यांमध्ये पसरले आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात वंदे भारत ट्रेनने पृथ्वीभोवती ३१० फेऱ्या माराव्या ऐवढा प्रवास केला.

Vande Bharat Train
Vande Bharat TrainSocial Media

दक्षिण मध्य रेल्वेचे प्रमुख पीआरओ ए श्रीधर यांनी सांगितले की, वंदे भारत ट्रेनचे जाळे सतत वाढवत ​​जात आहे आणि आणखी नवीन ट्रेन येत आहेत.

Vande Bharat Train
Vande Bharat TrainSocial Media

मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत विकसित केलेली वंदे भारत एक्स्प्रेस लाखो लोकांना लक्झरी अनुभवासह परवडणारा प्रवास प्रदान करते.

Vande Bharat Train
Vande Bharat TrainSocial Media

देशातील पहिली वंदे भारत ट्रेन १५ फेब्रुवारी २०१९ रोजी नवी दिल्ली ते वाराणसी दरम्यान सुरू झाली. सध्या देशात फक्त चेअर कार क्लासमध्ये वंदे भारत सुरू आहे.

Vande Bharat Train
Vande Bharat TrainSocial Media

या महिन्याच्या सुरुवातीला रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले होते की, वंदे भारत स्लीपर ट्रेनची चाचणी येत्या दीड ते दोन महिन्यांत सुरू होईल. ही ट्रेन तीन महिन्यांनी सेवेत येईल.

Vande Bharat Train
Vande Bharat TrainSocial Media

वंदे भारत स्लिपर, वंदे चेअर, वंदे मेट्रो आणि अमृत भारत या चार ट्रेन येत्या काळात आपल्या देशवासीयांना चांगली सेवा देतील. या नव्या ट्रेनमध्ये आणखी चांगल्या सुविधा मिळणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com