नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचा तुमचा प्लान झाला नसेल तर स्वतःसोबत हा निवांत वेळ घालवा आणि नवीन वर्षाचे स्वागत करा.
नवीन वर्षात मित्रांसोबत तुम्ही घरीच सिनेमा पाहायचा आनंद घेऊ शकता. तुमचे आवडते चित्रपट घरबसल्या तुम्ही पाहू शकता.
तुम्ही घरी पार्टीचे आयोजन करून मस्त, चवदार पदार्थांची मेजवानी करू शकता. तुम्ही सर्वजण मिळून केक आणि चॉकलेट्स बनवू शकता.
कोणतीही होम पार्टी गेम शिवाय अपुरी असते. त्यामुळे तुम्ही घरी भन्नाट गेम खेळू शकता. यात अंताक्षरी आणि पत्ते यांचा समावेश करा.
नवीन वर्षाचा संकल्प ठरवा आणि त्यासाठीचे प्रयत्न सुरू करा. एका कागदावर स्वतःची ध्येय लिहून निश्चित करा.
नवीन वर्षाची सुरुवात स्वतःला वेळ देऊन करा. बाहेर पार्टी करण्यापेक्षा स्वतःशी संवाद साधा. नवीन छंद जोपासा.
नवीन वर्षाच्या सुरुवातीला टीव्ही आणि यूट्यूबवर अनेक कार्यक्रम दाखवतात. तर तुम्ही घरबसल्या या कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकता.
नवीन वर्षाच्या सुरुवात कुटुंबासोबत करा. रात्रभर गप्पा मारा. जुन्या वर्षातील आठवणींना उजाळा द्या. एकमेकांविषयी भरभरून बोला.
नवीन वर्षात तुमच्या आवडत्या व्यक्तींना भेट वस्तू द्या. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद घेऊन या. तसेच एक गिफ्ट स्वतःसाठी देखील घ्या.
जुन्या वर्षात राहिलेल्या गोष्टी मार्गी लावून नवीन प्रवासाला सुरुवात करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.