Vastu Tips: घरातील तुळशीजवळ 'या' वस्तू चुकूनही ठेऊ नये अन्यथा....
Tulsi Vastu Tips In Marathi: आपल्यापैंकी प्रत्येकाच्या घरी तुळशीचे लहानसे एक रोप असते. मात्र तुम्हाला माहिती आहे का? अशा काही वस्तु आहेत ज्या तुळशीच्या बाजूला ठेवू नये.
हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला अत्यंत महत्त्वाचे समजले जाते. मात्र वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवल्या जाणाऱ्या तुळशीच्या रोपाबद्दल अनेक महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
Tulsi plantYandex
प्रत्येकाच्या घरी एक लहानसे तुळशीचे रोप आपल्याला दिसून येते. मात्र अनेकांच्या घराच्या बाहेर अर्थात अंगणात तुळशीचे रोप दिसून येते. तुळशीचे रोप लावल्यास परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण होते.
know yet?Yandex
मात्र आजवर तुम्हाला माहिती आहे का? तुळशीच्या रोपाजवळ काही वस्तू ठेवणे वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जाते.
SlippersYandex
घरात गेल्यानंतर आपल्यापैंकी प्रत्येकाला चप्पल कुठेही ठेवण्याची सवय असते. मात्र जर तुम्ही घरातील किंवा अंगणात असलेल्या तुळशीच्या रोपाजवळ चप्पल काढून ठेवू नये, असे केल्यास घरात ''वाद'' होऊ शकतात.
KersuniYandex
घर स्वच्छतेसाठी केरसुणीचा वापर प्रत्येक घरात करण्यात येतो. मात्र आपल्या घरात असलेल्या तुळशीच्या रोपाजवळ कधीही केरसुणी ठेवू नये, असे केल्यास घरात ''आर्थिक समस्या'' निर्माण होण्यास सुरुवात होते.
Mahadev PindYandex
वास्तुशास्त्रानुसार घरात असलेल्या किंवा अंगणात असलेल्या तुळशीच्या रोपाजवळ महादेवाची पिंड ठेवू नये, असे केल्यास घरात अनेक ''अशुभ प्रसंग'' घडण्यास सुरुवात होते.
Yandex
टीप :वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.