लवकर साबण संपण्यामागचे मुख्य कारण म्हणजे, साबण पाण्यात विरघळून जातो. त्यामुळे साबण पाण्यापासून दूर ठेवा.
पावसाळ्यात जास्त साबण सर्वाधिक आर्द्रता आणि दमटपणामुळे विरघळतो.
साबण विरघळणे धोकादायक ठरू शकते. कारण वारंवार साबण विरघळल्यामुळे बाथरूममध्ये साबणाचा फेस तयार होऊन जागा गुळगुळीत होते. परिणामी त्यावरून पाय घसरून पडण्याचा धोका वाढतो.
बाथरूममध्ये साबण ठेवताना वरून कोणत्याही प्रकारच पाणी पडणार नाही याची काळजी घ्यावी.
साबण बाथरूममध्ये हवेशीर ठिकाणी ठेवा. जेणेकरून जास्त काळ साबण ओला राहणार नाही.
बाथरूमचा वापर करून झाल्यावर तो स्वच्छ, कोरडा करा.
साबण बराच काळ टिकून राहण्यासाठी तो एकत्र वापरू नका. यामुळे साबण लवकर संपतो. साबणाचे मध्यम आकाराचे तुकडे करून वापरा.
बाजारात कमी पैशात Soap सेव्हर बॅग मिळते त्याचा वापर करा आणि साबणाला विरघळण्यापासून वाचवा.
Soap सेव्हर बॅगमुळे साबण लवकर सुकतो. ही बॅग तुम्ही बाथरूममध्ये कोरड्या ठिकाणी लटकवू शकता.
ओला झालेला साबण ठेवण्यासाठी तुम्ही साबणदानीचा वापर करू शकता. यामुळे साबण जास्त गळणार नाही.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.