Trimbakeshwar Jyotirlinga: हर हर महादेव! शेवटच्या श्रावण सोमवारी त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची विक्रमी गर्दी

Trimbakeshwar Jyotirlinga: त्र्यंबकेश्वर हे भारतातील एक प्राचीन तीर्थस्थान आहे. सर्व १२ ज्योतिर्लिंगापैकी हे एक मंदिर आहे. श्रावण सोमवारनिमित्त भगवान महादेवाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
Trimbakeshwar Jyotirlinga
Trimbakeshwar Jyotirlingasaamtv
Published on

श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी महाराष्ट्रातील दहावे ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर येथे लाखो भाविकांनी गर्दी केली.

मंदिर परिसर 'हर हर महादेव' आणि 'बम बम भोले'च्या जयघोषाने दुमदुमला.

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात सकाळपासूनच दर्शन रांगा लागल्या.

मंदिराच्या गाभाऱ्यात असलेले ज्योतिर्लिंग हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवांचे रूप आहे.

ज्योतिर्लिंगातील शिवलिंगात तीन लहान छिद्र आहेत. यात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवांचे अंश असल्याचे मानले जाते.

एका आख्यायिकानुसार येथील शिवलिंग स्वतः प्रकट झाले होते.

गौतम ऋषींवर गायींच्या हत्येचा आरोप झाला होता. या हत्येच्या पापाचे प्रायश्चित्त करण्यासाठी गौतम ऋषींनी गंगा नदीला तेथे आणलं होतं.

तपश्चर्या करून भगवान शंकराला प्रसन्न केलं होतं. त्यानंतर गौतम ऋषींनी गंगा नदीला ब्रह्मगिरी डोंगरावर पाठवण्याची मागणी केली.

पण महादेव जेथे असतील तेथेच गंगा असेल असं देवीनं म्हटलं होतं तेव्हा महादेव तेथे प्रकटले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com