राजगीऱ्याचे लाडू उपवासासाठी खास आहेत. प्रत्येक व्यक्ती हे लाडू उपवासात खातात. उपवास असताना अन्य काही गोड खाण्याऐवज तुम्ही हा लाडू खाऊ शकता.
राजगीऱ्याचा लाडून बनवण्यासाठी तुमच्याकडे राजगीऱ्याचे धान्य असणे महत्वाचे आहे.
सर्वात आधी राजगीरा मस्त एका पॅनमध्ये भाजून घ्या. राजगीरा भाजला की एका दुसऱ्या वाटीत काढून घ्या.
तुम्ही २०० ग्रॅम गुळासाठी दोन मोठ्या वाट्या भरून राजगिरा वापरू शकता. मात्र राजगिरा भाजला आहे ते आधी तपासा.
त्यानंतर गुळाचा पाक बनवा. गुळाचा पाक बनवताना त्यात पाणी किंवा तूप असं काहीही मिक्स करू नका.
गूळ वितळल्यावर त्यात राजगीरा मिक्स करा आणि सुंदर गोलाकार लाडू बळून घ्या.
राजगीरा अत्यंत पौष्टीक आहे. त्यामुळे तुम्ही उपवासाच्या दिवशी याचे सेवन केल्याने पोट भरलेलं राहतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.