Koregaon Bhima Shaurya Din : भीमा कोरेगावात जनसागर उसळला; डोळ्याचे पारणे फेडणारा क्षण, पाहा ड्रोनमधून टिपलेली सोहळ्याची भव्यता

Koregaon Bhima Shaurya Din update : भीमा कोरेगावात जनसागर उसळला आहे. डोळ्याचे पारणे फेडणारा क्षण चर्चेत आला आहे. ड्रोनमधून टिपलेली सोहळ्याची भव्यता दर्शवत आहे.
Koregaon Bhima
Koregaon Bhima Shaurya Din Saam tv
Published on
Bhima Koregaon
Koregaon Bhima update Saam tv

पुण्यातील कोरेगव भीमा येथे लाखो आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने हजेरी लावतात. यंदाही २०७ वा शौर्यदिन साजरा करण्यासाठी अनुयायांनी हजेरी दर्शवली. कोरेगाव भीमामध्ये या विजयस्तंभाला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.

Bhima Koregaon update
Bhima Koregaon News Saam tv

कोरेगाव भीमा येथे शौर्य दिनानिमित्त शासनाकडून मोठी जय्यत तयारी करण्यात आली. या सोहळ्यासाठी पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या ठिकाणी तब्बल ५ हजार पोलीस सुरक्षिततेसाठी तैनात करण्यात आले आहेत.

Koregaon Bhima
Koregaon Bhima NewsSaam tv

कोरेगावा भीमा येथील विजयस्तंभास मोठ्या प्रमाणात सजावट करण्यात येते. वीस गुंठे जागेमध्ये असलेला हा ७५ फुटी ऐतिहासिक विजयस्तंभ आहे. या स्तंभावरील फुलांची सजावट, अशोकचक्र, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यांसहित संविधानाचे तैलचित्र सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

vijay diwas
Koregaon Bhima updateSaam tv

भीमा नदीच्या काठी कोरेगावात १ जानेवारी १८१८ रोजी लढाई झाली होती. हे युद्ध इंग्रज आणि पेशव्यांमध्ये झालं होतं. त्याकाळी इंग्रजांनी महार समाजातील सैन्याच्या बळावर पेशव्यांविरुद्ध युद्ध पुकारलं होतं.

Koregaon Bhima latest update
Koregaon Bhima latest update Saam tv

या युद्धात इंग्रजांनी जवळपास ५०० सैनिकांच्या मदतीने युद्ध पुकारलं होतं, असे संदर्भ विविध पुस्तकात देण्यात आले आहेत. कमी सैन्यबळ असतानाही 'महार रेजिमेंट'ने संख्येने ४० पट अधिक असणाऱ्या पेशव्यांचा पराभव केल्याचे पुस्तकात सांगितलं जातं.

bhima koregaon
bhima koregaon vijay stambhsaamtv

'महार रेजिमेंट'ने पेशवाई सैन्याचा धुव्वा उडवल्यानंतर अवघ्या १६ तासांत पराभव पत्करण्याची वेळ आली होती. त्यानंतर १ जानेवारी १८१८ रोजी सायंकाळी सहा वाजता विजय झाल्याची घोषणा करत पेशव्यांच्या सैन्यावर कब्जा करण्यात आला, अशी माहिती इतिहासकार सांगतात.

Vijayastambh pune
Koregaon Bhima VijayastambhSaam TV

या लढाईत प्राणाची आहुती देणाऱ्या सैन्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आणि शौर्याचे प्रतिक म्हणून ब्रिटाशांनी भीमा नदीच्या तीरावर एक भव्य क्रातिस्तंभ उभारल्याची माहिती विविध पुस्तकात वाचायला मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com