केंद्र सरकारकडून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) सदस्यांसाठी दिवाळीपूर्वी मोठी आनंदाची खबर येणार आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये होणाऱ्या बैठकीत सरकार कर्मचारी आणि पेंशनधारकांसाठी पाच महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करू शकते.
यामध्ये किमान पेंशन वाढ, विमा संरक्षणाचा विस्तार, डिजिटल सुविधांचा विस्तार आणि पीएफ निकासी प्रक्रिया आणखी सोपी करणे यांचा समावेश असेल.
सध्या 96 टक्के पेंशनधारकांना 4,000 रुपयांपेक्षा कमी पेंशन मिळते. त्यामुळे या बैठकीत कर्मचारी पेंशन योजने अंतर्गत किमान मासिक पेंशन 1,000 रुपयांवरून 1,500 किंवा 2,500 रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
याचबरोबर सरकार ईपीएफओ 3.0 ही नवीन डिजिटल सेवा सुरू करणार असून यामध्ये कर्मचारी यूपीआय आणि एटीएमद्वारे पीएफची रक्कम सहजपणे काढू शकतील. त्याचप्रमाणे, पीएफ शिल्लक, मासिक जमा रक्कम आणि क्लेमची स्थिती यांसारखी माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल.
सध्या प्रत्येक सदस्याला कर्मचारी ठेव संलग्न विमा योजनेअंतर्गत सात लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते. ही रक्कमही वाढण्याची शक्यता असून कर्मचाऱ्यांना आणखी मोठा फायदा मिळणार आहे.
दिवाळीपूर्वी या निर्णयांची अंमलबजावणी झाल्यास पाच कोटींहून अधिक कर्मचारी आणि पेंशनधारकांना मोठा दिलासा मिळेल आणि त्यांचे भविष्य अधिक सुरक्षित होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.