वेळेचा अभाव, तेलकट-तिखट पदार्थ खाणे यामुळे पोटाच्या गंभीर समस्या उद्भवत आहेत.
बद्धकोष्ठता, गॅस, ॲसिडिटी, पोट फुगणे या पोटाच्या समस्यांमुळे अनेकजण त्रस्त आहेत.
अन्नपदार्थ खाताना काही सवयी बदलल्यास तुम्हाला पोटाचा त्रास जाणवणार नाही.
जेवताना कधीही पाणी पिऊ नये. जेवण करण्याच्या ३० मिनिटाआधी नेहमी पाणी प्यावे.
आहारात आल्याचा समावेश केल्याने अपचन आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. यासाठी सकाळी आल्याचे पाणी, आल्याचा चहाचे सेवन करणे फायदेशीर ठरेल.
दही आरोग्यासाठी फायदेशीर आहे ज्यामुळे पचनक्रिया देखील सुधारते. आहारात दह्याचा समावेश केल्याने पोट थंड राहते,शिवाय अन्नही लवकर पचते.
जेवल्यानंतर लगेच झोपू नये.जेवल्यानंतर १० ते १५ मिनिटे चालल्याने बद्धकोष्ठता किंवा गॅसेससारखा त्रास होत नाही.