आजकाल जेवण कमी आणि स्नॅक्स खाण्याचे प्रमाण वाढले आहे. पण जास्त प्रमाणत स्नॅक्स खाल्ल्याने आरोग्याला नुकसान होऊ शकते.
बाजारात अनेक प्रकारचे स्नॅक्स उपलब्ध आहेत .काही तोंडाची चव वाढवतात तर काही शरीराला ऊर्जा देतात. कारण कोणतेही असो जास्त स्नॅक्स खाणे आरोग्यास उत्तम नाही.
कोणताही स्नॅक्स हा कॅलरीयुक्त असतो. यामुळे वजन मोठ्या प्रमाणात वाढते.
स्नॅक्स चटपटीत बनवण्यासाठी त्यामध्ये अनेक पदार्थ टाकले जातात. यामुळे शरीराला संसर्ग होण्याच धोका वाढतो.
सतत स्नॅक्स खाल्ल्यास शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. परिणामी हृदयासंबंधित आजार बळावतात.
जास्त प्रमाणात स्नॅक्स खाल्ल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. परिणामी मधुमेहाची समस्या उद्भवते.
कधीही सायंकाळी स्नॅक्सचे सेवन करू नका. कारण सूर्यास्तानंतर आपली पचनक्रिया मंदावते. त्यामुळे पदार्थ पचायला कठीण जातो.
तुम्हाला स्नॅक्सची भूक लागल्यास सुकामेवा आणि फळांचा आस्वाद घ्या. यामुळे शरीराला ऊर्जा मिळेल.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.
Edited By: Nirmiti Rasal
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.