महाराष्ट्रात पर्यटकांना फिरण्यासाठी अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत.
हे शहर त्याच्या अविस्मरणीय सुंदर दृश्यांसाठी आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे पर्यटकांचे नेहमी लक्ष वेधून घेत असते.
म्हणून आज तुम्हाला काही खास सूर्येादय आणि सूर्यास्ताच्या पर्यटन स्थळांबद्दल सांगणार आहोत.
निसर्गप्रेमी पर्यटकांना सुट्टीमध्ये फिरण्यासाठी ही उत्तम ठिकाणे आहेत.
जर तुम्ही सुट्टीमध्ये माथेरानला गेला असाल तर, या ठिकाणी पोर्क्युपिन पॉइंट हे सुंदर पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणाला भेट दिल्यावर पर्यटकांना सूर्याचे सुंदर दृश्य पाहता येणार आहे.
याबरोबर माथेरानमधील दुसरे प्रसिद्ध ठिकाण म्हणजे पॅनोरमा पॉइंट होय. या पर्यटन स्थळामधील सूर्येादय आणि सूर्यास्ताचा अनुभव घेण्यासाठी लाखो पर्यटक मोठ्या संख्येने येतात.
कोलशेत खाडी हे ठिकाण ठाण्यात प्रसिद्ध आहे. येथे पर्यटक सूर्येादयाचा अनुभव घेऊ शकता. निसर्गप्रेमी पर्यटकांसाठी हे अगदी उत्तम ठिकाण आहे.